ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानाची रेकी करण्यात आल्याचे प्रकरण समोर येताच मोठी खळबळ उडाली होती. एका दुचाकीवर दोन जण घराच्या आसपास रेकी करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. याचा व्हिडीओही समोर आला होता. यानंतर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा अलर्ट झाली होती.
संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी शुक्रवारी त्यांच्या मैत्री बंगल्याची रेकी करण्यात आल्याचा आरोप केला होता. शुक्रवारी सकाळी भांडुपमधील संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ या बंगल्याची दोन मोटरसायकलवरून अज्ञातांनी संशयास्पदरित्या तपासणी केली होती. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. घातपाताचा कट असून सामना कार्यालय आणि संजय राऊतांचे दिल्लीमधील निवास्थान येथेही रेकी झाल्याचा आरोप संजय राऊतांनीही केला होता. यानंतर संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
हे ही वाचा :
“मच्छर मारायला गुड नाइटचे कॉइल लावावे लागतात रेकीची गरज नाही”
मुंबई महापालिकेसाठी माविआची साथ सोडत ठाकरेंचा स्वबळाचा नारा?
पंतप्रधान मोदी दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर रवाना; आखाती देशाचा दौरा भारतासाठी महत्त्वाचा का?
कल्याण प्रकरण; धीरज देशमुख यांच्यावर हल्ला करणारे सुमित जाधव, दर्शन बोराडे अटकेत
संजय राऊत यांच्या घराबाहेर पाहणी करत असणाऱ्या चार व्यक्ती या मोबाईल नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करण्यासाठी आल्या होत्या, असं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी फोनद्वारे पोलिसांना घराची रेकी झाल्याचे कळवले. ‘मैत्री’ बंगल्यासमोर सकाळी ९.१५ च्या सुमारास दोन संशयित इसम मोटार सायकलवर येऊन त्यांच्या घराची रेकी करुन निघून गेले आहेत, अशी माहिती देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली असता लक्षात आले की, हे चार जण सेलप्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी आहेत. ते ईरिक्सन कंपनीकडून जीओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करत होते आणि तशी खात्री संबंधित कंपनीकडून करण्यात आली आहे.