शेतकरी आंदोलनाचे पाकिस्तान कनेक्शन उघड

शेतकरी आंदोलनाचे पाकिस्तान कनेक्शन उघड

पाकिस्तानी गुप्तचर संगठना आयएसआय आणि परदेशातील खलिस्तानी संगठनांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. अशी माहिती दिल्ली पोलीस आणि भारतीय गुप्तचर संगठनांच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेतून दिली.

जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच आंदोलनकर्त्यांनी २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याची घोषणा केली होती. या रॅलीतून प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात बाधा आणण्यासाठी पाकिस्तानमधून ३०० हून अधिक ट्विटर हॅन्डल्स चालवण्यात येत आहेत. यातून शेतकऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न होत असल्याचीही माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीत अनेक ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. “सिख्स फॉर जस्टीस” (एसएफजे) या बंदी घातलेल्या संगठनेने एका व्हिडिओमधून काही नेत्यांना आणि मोक्याच्या स्थळांना लक्ष करणार असल्याचे घोषित केले आहे. “सिख्स फॉर जस्टीस” ही संगठना भारत सरकारने “युएपीए” कायद्यांतर्गत दहशतवादी संगठना म्हणून घोषित केली आहे. खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंगचे पोस्टर्सही या रॅलीमध्ये झळकावले जातील अशी शक्यता दिल्ली पोलिसांनी वर्तवली आहे.

भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा वापर करून भारताची बदनामी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये १३-१८ जानेवारी दरम्यान ३०० होऊन अधिक ट्विटर हँडल्स बनवण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

Exit mobile version