वीजबिल वाढी विरोधात भाजपा करणार राज्यव्यापी आंदोलन

वीजबिल वाढी विरोधात भाजपा करणार राज्यव्यापी आंदोलन

“कोरोना काळात राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही. आता त्यांना भरमसाठ वीज बिल पाठवून वीज तोडण्याच्या नोटीसाही बाजवल्या आहेत. ही अत्यंत संतापजनक बाब असून आम्ही सरकारला शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू देणार नाही. शेतकऱ्यांचं वीज तोडणाऱ्या सरकार विरोधात लवकरच राज्यव्यापी प्रचंड आंदोलन उभारण्यात येईल.” अशी घोषणा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. “राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन तोडण्यासाठी नोटीसा बाजवल्या आहेत. शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. सोयाबीनचा हंगाम आला आहे. अशा वेळी वीज तोडल्यास शेतकऱ्यांचं हातातलं पीक निघून जाईल आणि शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरणार नाही. शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन अवेळी तोडणे योग्य नाही.” असे सांगतानाच सरकारच्या या अरेरावी विरोधात आम्ही जोरदार आंदोलन करणार आहोत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा: 

महाराष्ट्राच्या जनतेला ठाकरे सरकारचा शॉक

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सरकारविरोधात संघर्ष करण्याचं आवाहन केले. तसेच तुमचं वीज कनेक्शन कोणी तोडायला आलं तर आम्हाला कळवा, आमचे कार्यकर्ते तुमच्या मदतीला धावून येतील. असं सांगतानाच शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कोणी तोडायला आल्यास तिथे धावून जा, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. राज्य सरकारने वीज कंपन्यांनाना दहा हजार कोटी रुपयांचं अनुदान देण्याची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेतून केली.

“वीज कंपन्याना दहा हजार कोटींचं अनुदान देऊन शेतकऱ्यांची वीज बिल माफ करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी आठ पत्रं लिहिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी माझ्या एकाही पत्राला उत्तर दिलेलं नाही. नागपूरची ७७८ कोटींची डीपीसी ५०० कोटींवर आलीय. तो निधीही मिळत नाही. उपराजधानी असलेल्या नागपूरचे पैसेही राज्यातील विदर्भातील मंत्री आणू शकले नाहीत.” अशी टीकाही त्यांनी केली.

Exit mobile version