राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली

राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचा ट्विट ही केला नाही. सामनातून दर चार दिवसांनी राहुल गांधी यांची आरती ओवाळली जात असताना त्यांनी मात्र शिवसेनेला जागा दाखवून दिली.

मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी इंदिरा गांधींपासून अहमद पटेलांपर्यंत सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मात्र  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला त्यांना अभिवादन करावेसे वाटले नाही. शिवसेनाप्रमुखांना अनुल्लेखाने मारण्याचा हा प्रकार होऊनसुद्धा गप्प बसणे ही  शिवसेनेची लाचारी नाही का? असा सवाल नेटकरी करत आहेत.

https://twitter.com/MayhurVaidya/status/1353226115091816448?s=20

शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर ज्या अहमद पटेलांचे धड नावही घेतले नाही, ज्यांच्यावर टीकेची सतत झोड उठवली, त्यांच  पटेलांना श्रद्धांजली अर्पण करताना उद्धव ठाकरेंनी त्यांचे गोडवे गायले. काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याच्या जयंती आणि पुण्यतिथीला उद्धव ठाकरे हात जोडून प्रतिमेसमोर नतमस्तक होत असत. या काँग्रेस प्रेमातून की काय, दिवंगत पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या जयंती दिनी उद्धव ठाकरेंनी त्यांना साधे अभिवादनही केले नाही. परंतु सत्तेची गणितं सांभाळण्यासाठी काँग्रेसला वारंवार चुचकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना राहुल गांधींनी त्यांची जागा दाखवली. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीला भाजपासह अनेक पक्षांच्या नेत्यांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले असताना. राहुल गांधींना मात्र शिवसेनाप्रमूखांसाठी एक ट्विट करावेसेही वाटले नाही.

 

काँग्रेसकडून शिवसेनेचा असा सतत पाणउतारा होत असताना शिवसेना मात्र सत्तेच्या लोभासाठी त्यांना घट्ट चिकटून बसली आहे. अपमानाकडे दुर्लक्ष करून वारंवार सामनामधून राहुल गांधींवर स्तुती सुमनांची उधळण केली जाते. शिवसेनेच्या या दयनीय अवस्थेवर सोशल मीडियातून झोड उठवण्यात आली.

Exit mobile version