राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला

राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. सध्या त्यांची यात्रा आसाममध्ये आहे. दरम्यान, आसाममधील नगांव येथील एका मंदिरात राहुल गांधी यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. या मंदिरात आपल्याला प्रवेश देण्यात आलेला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसची न्याययात्रा सध्या आसाममध्ये पोहचली आहे. राहुल गांधी आसामच्या वैष्णव विद्वान श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पूजा-अर्चना करणार होते. आसामच्या नागांव जिल्ह्यात बोरदोवा ठाणा क्षेत्रातील हे पवित्र स्थळ आहे. श्रीमंत शंकरदेव यांच हे जन्म स्थान आहे. “मला मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. मंदिरात जाऊन मी फक्त प्रार्थना करणार होतो. मंदिरात कोण जाणार? हे आता पंतप्रधान ठरवणार का? आम्हाला कुठली समस्या निर्माण करायची नाही, फक्त मंदिरात जाऊन पूजा करायची आहे” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मंदिरात जाण्यापासून रोखल्यानंतर राहुल गांधी धरणे आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य नेते आणि समर्थकही धरणे आंदोलनाला बसले आहेत.

काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, “हे सर्व राज्य सरकारच्या दबावाखाली सुरु आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी मंदिर मॅनेजमेंटकडून वेळ मागितला होता. मंदिर व्यवस्थापकांना कोणतीही अडचण नव्हती. पण आता राज्य सरकारच्या दबावानंतर हे सर्व सुरु आहे.”

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधले नसते!

किती जण ‘एक राष्ट्र एक निवडणुकी’च्या बाजूने?

अयोध्येच्या पानविक्रेत्याचा व्यवसाय फळफळला!

खोदकामात मिळालेल्या ८४ खांबांनी दिला राममंदिराच्या अस्तित्वाचा पुरावा

बारदोवा थान हे १५व्या- १६व्या शतकातील सामाजिक- धार्मिक सुधारक आणि आसामी संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान परिसरात वसलेले आहे. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जोगेंद्र नाथ देव महंत यांनी रविवारी दुपारी बारदोवाचे काँग्रेस आमदार शिबामोनी बोरा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अनेक संस्थांनी भक्तिमय कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

Exit mobile version