मेट्रोच्या विलंबावरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मेट्रोच्या विलंबावरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे सरकारवर मेट्रोच्या कामात दिरंगाई करण्यावरून हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोमधून प्रवास केला आणि मुंबईकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी कधी मिळणार असा सवालही त्यांनी केला.

मुंबईमध्ये मेट्रो ३ प्रकल्पाचे काम आता अनेक वर्षे प्रलंबित राहिले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रो प्रकल्पाबाबत विशेष रुची घेऊन फडणवीसांनी या कमला गती दिली होती. फडणवीसांनी अश्विनी भिडे यांना मेट्रो महासंचालकपदी नियुक्त केले होते. उद्धव सरकारने जानेवारी २०२० मधेच अश्विनी भिडेंना या पदावरून काढून टाकले. २०१९ च्या नवडणुकांपूर्वीच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी मेट्रो कारशेडचा मुद्दा उचलला होता. ठाकरेंच्या मते आरे मध्ये मेट्रोची कारशेड उभारल्याने पर्यावरणाला नुकसान होणार आहे. अश्विनी भिडे आणि तत्कालीन सरकारने अनेक कार्यक्रम घेऊन जनतेला हा मुद्दा पटवून दिला होता की, पर्यावरणाचे होणारे नुकसान हे प्रकल्पामुळे पर्यावरणाला होणाऱ्या फायद्यापेक्षा कैक पटींनी कमी आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोतून दिल्ली विमानतळापर्यंत प्रवास केला आणि मुंबईकरांना मुंबई विमानतळापर्यंत असा प्रवास कधी करता येणार? असा सवाल उद्धव ठाकरे सरकारला केला. मेट्रो ३ हा प्रकल्प मुंबई विमानतळाला मट्रोच्या जाळ्याशी जोडतो.

Exit mobile version