महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोलेंची निवड झाली आहे. नाना पटोलेंनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होते.
Nana Patole has been appointed as the President of Maharashtra Pradesh Congress Committee. (File photo) pic.twitter.com/YdbnalZ5hU
— ANI (@ANI) February 5, 2021
गेले अनेक दिवस काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोलेंकडे जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळांमध्ये होती. नाना पटोले हे २०१९ मध्ये विधानसभा अध्यक्ष निवडले गेले होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उपमुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस पक्षाकडे विधानसभा अध्यक्षपद आलेले होते.
हेही वाचा:
१९९९ ते २०१४ पर्यंत ते काँग्रेस पक्षाकडून आमदार होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकून आले. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मंत्री प्रफुल्ल पटेल यांना हरवले होते. परंतु नाना पटोले यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले नाही. २०१८ मध्ये पाटोळे यांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा काँग्रेस पक्षात गेले.
हेही वाचा:
आज सकाळपासून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु आता नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही नाना पटोलेंनी राजीनामा देण्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार या मुद्द्यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.