भाजप आंध्र प्रदेशात सहा जागा लढवणार

भाजप आंध्र प्रदेशात सहा जागा लढवणार

आगामी लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तेलुगू देसम पक्षाचे जागावाटप निश्चित झाले आहे. त्यामुळे आता भाजप आंध्र प्रदेशात लोकसभेच्या सहा जागा लढवणार आहे. तर, तेलुगू देसम पक्ष १७ जागांवर निवडणुका लढेल. तर, जनसेना पक्ष उर्वरित दोन जागा लढवेल.

भाजपने सोमवारी चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष आणि पवन कल्याण यांचा जन सेना पक्ष यांच्यासोबत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित केले.

विधानसभा निवडणुकीचे जागावाटपही निश्चित झाले आहे. या निवडणुकीत भाजप १० जागा लढणार असून तेलुगु देसम पक्ष १४४ जागा लढणार आहे. तर, अभिनेता व राजकीय नेता पवन कल्याण यांचा जन सेना पक्ष २१ जागा लढवेल. आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबतच होणार आहेत.

हे ही वाचा..

डीआरडीओचे ”मिशन दिव्यस्त्र” यशस्वी, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन!

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!

“उबाठाच्या बाळराजांना सांगणं आहे, जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो”

भाजप, तेलुगु देसम पक्ष आणि जनसेना पक्षाने ९ मार्च रोजीच ते लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या जातील, असे जाहीर केले होते. तत्पूर्वी ८ मार्च रोजी चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

Exit mobile version