26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणभाजपचा अँग्री यंग मॅन अण्णामलाई यांचे लोकसभेत आगमन होण्याची शक्यता

भाजपचा अँग्री यंग मॅन अण्णामलाई यांचे लोकसभेत आगमन होण्याची शक्यता

Google News Follow

Related

स्वतःच्या आक्रमक राजकीय शैलीमुळे पक्षात आणि पक्षाबाहेरही चर्चेत राहणारे तमिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई हे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सन २०२१ मध्ये भाजपाच प्रदेशाध्यक्ष होणारे ते सर्वांत तरुण नेते ठरले होते. ३९ वर्षीय माजी आयपीएस अधिकारी असणाऱ्या के. अण्णामलाई यांनी नेहमीच तमिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आक्रमकपणे लढा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला निवडणुकीत तितकेसे यश मिळाले नसले तरी, दक्षिणेकडील या राज्यात पक्षाने चांगली पकड मिळवली आहे.

तमिळनाडू राज्यात नेहमीच द्रमुक आणि अण्णाद्रमुक या द्रविडियन पक्षांची सत्ता राहिली आहे. मात्र माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष कमजोर झाला आहे. सन २०२१ मध्ये द्रमुक सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्याचे काम भाजपने केले आहे. भाजपने अण्णामलाई यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना राज्यात भाजपचे नेतृत्व करण्याची संधी दिली. वर्षभरापूर्वीच त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांना पक्षात आणण्याचे श्रेय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांच्याकडे जाते.

कडक शिस्तीचे अण्णामलाई यांना ‘सिंघम अण्णा’ बोलले जाते. त्यांच्या साथीने भाजपला एक मजबूत हात मिळाला आहे. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे एकही जागा मिळू शकली नव्हती.

मेकॅनिकल इंजिनीअर ते सिंघम अण्णा

अण्णामलाई हे करूर जिल्ह्यातील थोट्टामपट्टी गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. अण्णामलाई हे कोंगू जिल्ह्यात प्राबल्य असलेल्या गाऊंडर समाजाचे आहेत. आयआयएम-लखनऊमधून एमबीएची पदवी मिळवणारे अण्णामलाई मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. ते सन २०११ मध्ये पोलिस दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांची कर्नाटकमध्ये सहायक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्या आठ वर्षांत एक कडक शिस्तीचे पोलिस म्हणून त्यांची ओळख झाली. त्यांनी गुटखाविक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडले तसेच, अमली पदार्थांविरोधी मोहीम उघडली. बेंगळुरूचे उपायुक्त असताना सन २०१९मध्ये त्यांनी पोलिस दलाचा राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभरानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान यांचा विनम्रशील प्रवास त्यांना प्रेरित करतो. ‘मी मोदीजींचा खूप मोठा चाहता आहे… एक सामान्य माणूस शिखरावर पोहोचण्याची आणि ध्येय गाठण्याची आकांक्षा बाळगू शकतो आणि त्याला कोणत्याही घराणेशाहीतून येण्याची गरज नाही, हेच त्यांनी दाखवून दिले आहे,’ असे अण्णामलाई म्हणतात. अण्णामलाई यांनी सातत्याने तमिळनाडूत भाजपची बाजू बळकट कशी होईल, यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

हे ही वाचा:

‘माझ्या आईचा फोन आला नसता तर…’

आसाराम बापू तुरुंगातच राहणार

विधानसभेत विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टोलेबाजी

मदतीच्या प्रतीक्षेत जमलेल्या १०४ पॅलिस्टिनींचा चेंगराचेंगरीत मृत्यू

विरोधी पक्षांचा चेहरा

तमिळनाडू विधानसभेत अण्णाद्रमुक हा विरोधी पक्षांमधील सर्वांत मोठा पक्ष असला तरी विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून अण्णामलाई यांनी स्थान पटकावले आहे. त्यांनी सत्ताधारी पक्षावर सातत्याने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढा दिला आहे. गेल्या वर्षी त्यांनी त्यांनी डीएमके फाइल्स नावाची ऑडिओ टेप काढली होती. ‘उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांचा जावई साबरीसान यांनी एका वर्षात ३० हजार कोटी रुपये कमवले,’ असे माजी अर्थमंत्री पालिवेल थिआगा राजन हे पत्रकाराला सांगत असल्याचे ऐकू येत आहे. अर्थात द्रमुकने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर अनेक मंत्र्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. भाजपचा काही गट अण्णामलाई यांच्यावर नाराज असला तरी भाजपनेत्यांच्या मते त्यांचा पक्ष अण्णामलाईच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. नुकतीच अण्णामलाई यांनी संपूर्ण राज्यभरातील २३४ मतदारसंघांतून पदयात्रा काढली होती. या पदयात्रेचा समारोप याच आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता. या पदयात्रेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद लाभला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा