24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपोलिसांनी मुंबईत अनेक ठिकाणी हटवले रामवर्गणीचे बॅनर

पोलिसांनी मुंबईत अनेक ठिकाणी हटवले रामवर्गणीचे बॅनर

Google News Follow

Related

मालवणी भागात लावलेले राम मंदिर निधी संकलनाचे बॅनर्स काल रात्री पोलिसांनी फाडले. बॅनर लावणाऱ्या आणि निधी संकलन करणाऱ्या दोन राम भक्तांना ताब्यात घेऊन मारहाण केली. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या रामभक्तांवर वरवंटा चालू लागला असून मुंबईत अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी सूचक मौन पाळले आहे. 

१५ जानेवारीपासून भारतभर राम मंदिरासाठी निधी संकलनाचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेकांनी या कार्यात आपले योगदान दिले आहे. एकीकडे भारतभर या निधी संकलनाला उदंड प्रतिसाद मिळत असताना महाराष्ट्रात मात्र प्रशासनाला हाताशी धरून या राष्ट्रीय कार्यात खोडा घालायचे काम सुरू आहे. राम मंदिर निधी संकलन कार्यक्रमाचे बॅनर्स मुंबईतल्या मालवणी भागात लावण्यात आले होते. इतर वेळी अनेक गंभीर बाबींमध्ये काहीही न करणाऱ्या मालवणी पोलिसांना हे बॅनर्स मात्र तेवढे खटकले. मंदिरासाठी निधी देण्याचे आवाहन करणाऱ्या या बॅनर्समध्ये कोणताही आक्षेपार्ह मजकूर नव्हता, हे विशेष.

पोलिसांनी हटवलेला बॅनर

मालवणी पोलिस रात्री उशीरा मार्वे रोड वरील अटलांटीस हाॅस्पिटलसमोरचे बॅनर्स काढताना विश्व हिंदू परिषदेच्या देव गोस्वामी आणि संदीप सिंग या कार्यकर्त्यांनी पाहीले. या बाबत विचारणा केली असता ‘आम्हाला वरून आदेश आहेत’ असे सरकारी उत्तर पोलिसांनी दिले. पोलिसांच्या या कारवाईचे व्हिडिओ शूटिंग हे कार्यकर्ते करू लागल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या शर्टची काॅलर पकडून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करत जीपमध्ये बसवले. यानंतर पोलिसांनी मालवणी फायर ब्रिगेडच्या इथले बॅनरही फाडून काढले. पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर दोघांचेही मोबाईल जप्त केले आणि व्हिडिओ डिलीट करायला सांगितले. हा प्रकार समजल्यानंतर काही वेळात स्थानिक रहीवासी तसेच भाजपा आणि विहिंपचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. अटक केलेल्या तरुणांच्या सुटकेची मागणी करत पोलिस ठाण्यात धरणे दिले साडे तीनपर्यंत धरणे सुरू होते अखेर पोलिसांना माघार घेत दोन्ही कार्यकर्त्यांना सोडून द्यावे लागले.


भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. “ठाकरे सरकार रामद्रोही असून पुन्हा एकदा त्यांचा चेहरा उघड करणारा हा प्रकार असलाची टीका त्यांनी केली. अशा हिंदूविरोधी घटना आम्ही सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.”

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनीही ठाकरे सरकारवर तोफ डागली असून “ठाकरे सरकारच्या तुघलक शाहीमुळे हिंदूंचे दमन सुरू असल्याचा आरोप केला आहे.”

मालवणी पोलीस स्टेशनला धरणे आंदोलन

धरणे आंदोलनात सहभागी असलेले मुंबई भाजपा सचिव विनोद शेलार यांनी “विशिष्ट समाजाला झुकतं माप देण्याची मालवणी पोलीस स्टेशनची परंपरा आहे, असा आरोप केला असून पोलिसांना रामजन्मभूमीच्या बॅनर्सचीच का अडचण होते?” असा सवाल उपस्थित केला आहे.

तर भाजपा उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक गणेश खणकर यांनी “आम्ही पहाटे ३ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दोषी पोलिसांवर १५ दिवसात कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले, अशी प्रतिक्रीया न्यूज डंकाशी बोलताना दिली.

दरम्यान, विहिंपच्या पदाधिका-यांनी याप्रकरणी शहराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मालवणी पोलिस कायदेशीर मार्गाने होणाऱ्या निधी संकलनात का आडवे येत आहेत? वरून आदेश देणारे नेमके कोण आहेत? असे सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

पोलिसांनी फेटाळले आरोप…
पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर होणारे आरोप फेटाळले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक  शेखर भालेराव यांनी मालवणीत असा कोणताही प्रकार झालेला नसून रामवर्गणीचा बॅनर खाली लोंबकळत होता. अपघात होईल अशी शक्यता वाटली म्हणून आम्ही तो काढला अशी सारवासारव केली.



spot_img

लेखकाकडून अधिक

4 कमेंट

  1. सध्या अयोध्या प्रभू श्री राम जन्म भूमी राष्ट्र मंदिर साठी वर्गणी मागायला राम सेवक जाणार आहे आणि त्यासाठी बेनर होर्डिंग्ज लावला असून काढायला सुरुवात केली ती आपल्या या लोकशाही देश मधे योग्य वाटत नाही आणि पोलीस अधिक्षक आणि सिपाई सुद्धा हिंदू धर्माचे आराध्य देवता भगवान श्री राम मध्ये आस्था आणि श्रद्धा ठेवत असेल म्हणून तिथल्या स्थानिक आमदार व मंत्री साहेबा नी सुद्धा दखल घेतली पाहिजे

  2. आपल्या सुधारणेच्या प्रतीक्षेत टिप्पणी आहे
    सध्या अयोध्या प्रभू श्री राम जन्म भूमी राष्ट्र मंदिर साठी वर्गणी मागायला राम सेवक जाणार आहे आणि त्यासाठी बेनर होर्डिंग्ज लावला असून काढायला सुरुवात केली ती आपल्या या लोकशाही देश मधे योग्य वाटत नाही आणि पोलीस अधिक्षक आणि सिपाई सुद्धा हिंदू धर्माचे आराध्य देवता भगवान श्री राम मध्ये आस्था आणि श्रद्धा ठेवत असेल म्हणून तिथल्या स्थानिक आमदार व मंत्री साहेबा नी सुद्धा दखल घेतली पाहिजे

    प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा