आज श्रावण पौर्णिमा. आजचा दिवस हा संस्कृत भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. देव वाणी म्हणून प्रसिद्ध असणारी संस्कृत भाषा ही अनेक भाषांची जननी मानली जाते. संस्कृतचे महत्त्व आणि व्याप्ती इतकी वाढली आहे की भारताबाहेर देखील परदेशातील नागरिकांना ही भाषा आत्मसात करायची असते.
आज या संस्कृत भाषा दिनाच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास ट्विट केले आहे आणि ते देखील संस्कृत भाषेत! आपल्या या ट्विटमध्ये मोदी म्हणतात,
“एषा भाषा प्राचीना चेदपि आधुनिकी,
यस्यां गहनं तत्त्वज्ञानम् अस्ति तरुणं काव्यम् अपि अस्ति,
या सरलतया अभ्यासयोग्या परं श्रेष्ठदर्शनयुक्ता च,
तां संस्कृतभाषाम् अधिकाधिकं जनाः पठेयुः।
सर्वेभ्यः संस्कृतदिवसस्य शुभाशयाः।”
एषा भाषा प्राचीना चेदपि आधुनिकी,
यस्यां गहनं तत्त्वज्ञानम् अस्ति तरुणं काव्यम् अपि अस्ति,
या सरलतया अभ्यासयोग्या परं श्रेष्ठदर्शनयुक्ता च,
तां संस्कृतभाषाम् अधिकाधिकं जनाः पठेयुः।
सर्वेभ्यः संस्कृतदिवसस्य शुभाशयाः।— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2021
याचा अर्थ असा की,
“ही भाषा प्राचिन आणि आधुनिक आहे. यामध्ये गहन तत्वज्ञान आणि तरूण असे काव्य आहे. ही भाषा सोपी, अभ्यासासाठी उत्तम आणि परंश्रेष्ठ अशी आहे. अशी ही संस्कृत भाषा अधिकाधिक लोकांनी शिकली पाहिजे. सर्वांना संस्कृत दिनाच्या शुभेच्छा”
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही
हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश
कल्याण सिंह यांच्या निधनानाने उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा
कल्याण सिंह यांच्या निधनाने देश हळहळला
पंतप्रधानांच्या या संस्कृत ट्विटला नेहमीप्रमाणेच नेटकऱ्यांनी चांगलेच उचलून धरले आहे. संस्कृत भाषेच्या प्रती मोदींनी व्यक्त केलेला आदर आणि संस्खृतचा केलेला वापर सार्यांनाच भावतो आहे.
संस्कृत भाषा सप्ताहाचे आयोजन
संस्कृत भाषा दिनाच्या निमित्ताने प्रति वर्षी संस्कृत भाषा सप्ताहाचेही आयोजन करण्यात येते. संस्कृत भाषा दिवस हा मध्य मानून त्याच्या आधीचे तीन दिवस आणि नंतरचे तीन दिवस असा हा सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाच्या निमित्ताने संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार, जनजागृती या दृष्टीने विशेष असे प्रयत्न केले जातात. त्यासाठी देशभर विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. या वर्षी १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट असे सात दिवस संस्कृत भाषा सप्ताह साजरा केला जात आहे.