काँग्रेसच्या घराणेशाहीवर कायम ताशेरे ओढणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता त्याच चालताना दिसत आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेने शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने एक सरकारी योजना सुरु केली आहे. या घोषणेमुळे आता राजकारणात घराणेशाहीचा ठाकरे पॅटर्न दिसू लागला आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेने ठाकरे घराण्याचे तरुण नेतृत्व असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या नावाने चारचाकी शिकवण्याची योजना सुरु केली आहे. ‘आदित्य ठाकरे युवा चारचाकी वाहन चालक परवाना प्रशिक्षण योजना’ असे नाव या योजनेला देण्यात आले आहे. या योजने अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील मागासवर्गीय तरुणांना वाहन परवान्यासाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदे मार्फत तीस लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
“पेंग्विन पाहायला या, पण शिवजयंतीला एकत्र आलात तर खबरदार”-आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सरकारी योजनांना द्यायचा सपाट लावला आहे. या सोबतच काही जुन्या विकास प्रकल्पांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निर्णयही ठाकरे सरकारने घेतले. त्यासाठी अनेकदा त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. त्यात आता शिवसेने मार्फत थेट आदित्य ठाकरेंच्या नावाने योजना सुरु झाल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा: