लोकसभेच्या रिंगणात राजू शेट्टींनी ‘माविआ’ची साथ सोडली

लोकसभेच्या रिंगणात राजू शेट्टींनी ‘माविआ’ची साथ सोडली

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसून आघाडीला समर्थन करणाऱ्या छोट्या पक्षांनीही आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मविआसोबतचे संबंध तोडून स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वीच घेतलेला, असा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. यामुळे राजू शेट्टी मविआपासून वेगळे झाले आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींना महाविकास आघाडी जागा सोडणार होती. रासपच्या महादेव जानकरांनाही जागा सोडली जाणार होती. दुसरीकडे वंचितसोबतही चर्चा सुरु होती. परंतु, आता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. मविआसोबतचे संबंध तोडून स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय आम्ही तीन वर्षांपूर्वीच घेतलेला, असा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. यामुळे राजू शेट्टी मविआपासून वेगळे झाले आहेत.

मविआ सोडण्याचा निर्णय २०२१ मध्ये नऊ पानी पत्र लिहून कळवला; पत्राची दखल घेतली नाही- राजू शेट्टी

“महायुतीचा पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल, तर स्वाभिमानी विरोधात उमेदवार देऊ नये,” असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ५ एप्रिल २०२१ ला कोल्हापूरमध्ये झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकारणीमध्ये चर्चा झाली होती. महाविकास आघाडीसोबत असणारे सगळे संबंध सोडून इथून पुढे स्वतंत्र निवडणुका लढवायच्या हा निर्णय जवळपास तीन वर्षांपूर्वी झालेला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुखांना आणि शरद पवार यांना आम्ही आघाडी सोडतोय असे नऊ पानांचे पत्रही दिले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते, त्या पत्राची काही दखल घेतली नाही. त्यामध्ये उपस्थित काही मुद्दे होते त्याचे काही उत्तर मिळाले नाही म्हणून आम्ही संघटनेमार्फत हा निर्णय घेतला आहे, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

“खिचडी चोराचं काम करणार नाही”

वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित

ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स

रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन

हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींना मविआ जागा सोडणार होती. रासपच्या जानकरांनाही जागा सोडली जाणार होती. वंचितसोबतही चर्चा सुरु होती. अशातच जानकरांनी फडणवीसांची भेट घेत महायुतीतूनच लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनीही लाचारी स्वीकारणार नाही असे स्पष्ट करत स्वतंत्र लढण्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version