बांग्लादेशी मुलीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्याची ‘घरवापसी’

दोन तासांच्या संभाषणानंतर आशिषला आपली चूक उमजली.

बांग्लादेशी मुलीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्याची ‘घरवापसी’

ऑनलाइन गेमद्वारे हिंदू तरुणांचे धर्मांतर करण्याच्या पूर्वी उघड झालेल्या कटाशी साम्य आढळणारी घटना जेतपूरमधून समोर आली आहे. यावेळी वापर झाला तो इन्स्टाग्रामचा. या सोशल मीडियाच्या व्यासपीठावर भेटलेल्या बांगलादेशी मुलीशी लग्न करण्यासाठी एका हिंदू तरुणाने इस्लामचा स्वीकार केला. झाकीर नाईकच्या व्हिडिओंनी हा तरुण प्रभावित झाला होता.

 

मात्र स्थानिक हिंदू संघटना आणि साधूसंतांच्या मार्गदर्शनाखाली त्याची पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी करण्यात आली.
आशिष गोस्वामी या व्यक्तीने नवीन धर्म स्वीकारून शेख मोहम्मद अलसामी हे नाव धारण केले होते. तो दोन मुस्लिम साथीदारांसह जेतपूरच्या शासकीय रुग्णालयात सुंता करण्यासाठी आल्याने गोंधळ उडाला. अखेर बुधवारी ही बाब स्थानिक पोलिस ठाण्याच्या निदर्शनास आणून दिल्याने पुढील तपास सुरू झाला.

 

बुधवारी संध्याकाळपर्यंत ही बातमी स्थानिक हिंदू संघटनांपर्यंत पोहोचताच त्यांच्यात संतापाची लाट उसळली. हिंदू तरुणांना धर्मांतराच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करत स्थानिक हिंदू धर्म सेनेचे पूज्य आणि जेतपूरच्या नरसिंह मंदिराचे महंत कन्हैयानंद महाराज यांनी वेळ न दडवता हिंदू तरुणांचा एक मोठा गट एकत्र केला आणि रात्री त्या तरुणाच्या निवासस्थानी वैयक्तिकरीत्या भेट दिली. दोन तासांच्या संभाषणानंतर आशिषला आपली चूक उमजली. पश्चातापदग्ध आशिष गोस्वामी याने इस्लाम धर्म स्वीकारल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यानंतर महंत कन्हैयानंद महाराजांनी आशिषच्या कपाळाला चंदन टिळक लावून त्याला पुन्हा सनातन धर्मात आणले.

हे ही वाचा:

पंचायत निवडणूक: तृणमूल काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांची हत्या

शरद पवार म्हणाले की, भाजपाशी चर्चा केली होती; पण विचारधारेमुळे पुढे पाऊल टाकले नाही

आशियाई गेम्ससाठी कुस्तीगीरांची निवड चाचणी अजूनही रखडलेली

नीलम गोऱ्हे अंधारेंवर नाराज की उद्धव ठाकरेंवर

झाकीर नाईकच्या प्रभावाखाली या तरुणाने इस्लामचा स्वीकार केला होता. रात्री उशिरापर्यंत, या संघटनांचे उत्साही कार्यकर्ते तरुणांच्या निवासस्थानाबाहेर जमले आणि त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’चा नारा दिला. तसेच, एकत्रपणे हनुमान चालिसाचे पठणही केले.

Exit mobile version