अयोध्येत उभी राहणार राम युनिव्हर्सिटी

अयोध्येत उभी राहणार राम युनिव्हर्सिटी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत भगवान राम विद्यापीठ चालू करण्याची योजना आखली आहे.

या विद्यपीठात संस्कृती, रुढी, हस्तलिखिते आणि धार्मिक तथ्ये या विषयांवरील शिक्षण दिले जाणार आहे. स्वतः उच्च विद्याविभूषित असलेले उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी सांगितले की, या विद्यापीठातील मुलांना राम यांचे जीवन आणि त्यांची तत्त्वे यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हिंदू धर्म आणि संस्कृतीचे देखील शिक्षण देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

डेलकर प्रकरणी अनिल परब तोंडावर पडले

हे विद्यापीठ खासगी आणि सरकारी सहभागातून उभे राहणार आहे. अयोध्येतील संत आणि महंतांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

श्रीराम मंदिराचे प्रमुख आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की यामुळे आजकालच्या तरूणांना रामांची आणि हिंदु संस्कृतीची योग्य ओळख होईल. महंत परमहंस यांनी देखील मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांना राज्यात आणखी तीन नवी विद्यापीठे उभी करण्याची योजना आखली आहे. ही तीन विद्यापीठे अलिगढ, सहारणपूर आणि आज़मगड या ठिकाणी स्थापन केली जाणार आहेत. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, याशिवाय क्रिडा विद्यापीठ, आयुष विद्यापीठ आणि कायदे विद्यापीठ देखील स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र १६ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून, निश्चित आराखडा तयार करण्याचे काम देखील वेगाने सुरू आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका समितीची स्थापना उच्च शिक्षण, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणाच्या विविध विभागांतर्गत स्थापन करण्यात आली आहे.

सध्या उत्तर प्रदेशात २३ राज्य विद्यापीठे आणि तीन केंद्रीय विद्यापीठे आहेत.

Exit mobile version