धार्मिक स्थळांच्या नावाखाली अतिक्रमण करणाऱ्यांवर योगींचा दणका

धार्मिक स्थळांच्या नावाखाली अतिक्रमण करणाऱ्यांवर योगींचा दणका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यालगत असलेल्या धार्मिक स्थळांच्या नावाखाली केलेली अतिक्रमणे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्तर प्रदेशच्या गृह मंत्रालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक स्थळांच्या नावाखाली करण्यात आलेल्या अतिक्रमणांना तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

दिनांक १ जानेवारी २०११ रोजी अथवा नंतर करण्यात आलेली बांधकामे या आदेशांतर्गत पाडून टाकण्यात येणार आहेत. या पूर्वीची बांधकामे इतर खासगी जागांवर हलवण्यात येणार आहेत.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त प्रमुख गृह सचिव अविनाश अवस्थी यांनी या सूचना एका पत्राद्वारे दिल्या आहेत.

हे ही वाचा:

कोणीही येऊन हिंदूंना शिव्या घालाव्यात हीच ठाकरे सरकारची इच्छा

अयोध्येत उभी राहणार राम युनिव्हर्सिटी

अयोध्येचे विमानतळ लवकरच कार्यान्वित

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना १४ मार्च पर्यंत या संदर्भातील अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अहवालात, किती धार्मिक स्थळांच्या नावाखाली करण्यात आलेली अतिक्रमणे काढून टाकली याचे तपशिल देण्याचे सांगण्यात आले आहे.

एका पाहणीनुसार गेल्या काही काळात अनेक अतिक्रमणे वाढली आहेत. पुढे ही अतिक्रमणेच, मूळ स्थान असल्याचा दावा करून रस्त्यांवर आणखी अतिक्रमण केले जाते. याला आळा घालण्यासाठी योगींच्या सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे.

 

न्यूज डंका आता ऍप स्वरूपातही उपलब्ध!! लगेच डाऊनलोड करा!!

Exit mobile version