29 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरधर्म संस्कृतीदररोज १८ तास काम करून घडवली रामाची मूर्ती

दररोज १८ तास काम करून घडवली रामाची मूर्ती

पाच पिढ्यांपासून मूर्तिकाराचा व्यवसाय

Google News Follow

Related

रामलल्ला आपल्या नवनिर्मित मंदिरात श्याम वर्णामध्ये विराजमान होणार आहेत. या मूर्तीला कर्नाटकचे सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगिराज यांनी घडवले आहे. एमबीए केलेल्या अरुण योगिराज यांनी ही मूर्ती घडवण्यासाठी दररोज १८-१८ तास काम केले.

या मूर्तीला घडवण्यासाठी सुमारे सात महिन्यांचा कालावधी लागला. दररोज कामाला सुरुवात करण्यापूर्वी ते प्रभू श्रीरामाची आरती-पूजा आणि हनुमान चालिसाचा पाठ करत असत. कधी कधी तर ते कामात इतके रंगून जात, की १५-१५ दिवस कुटुंबीयांशी बोलतही नसत.

पाच पिढ्यांपासून मूर्तिकाराचा व्यवसाय

अरुण यांना लहानपणापासूनच मूर्ती घडवण्याची आवड होती. एमबीए केल्यानंतर ते एका खासगी कंपनीत काम करू लागले, मात्र त्यांनी मूर्तिकला सोडली नाही. अखेर त्यांनी २००८मध्ये नोकरीला रामराम ठोकून मूर्तिकलेतच करीअर करण्याचे ठरवले. निर्णय कठीण होता, मात्र ते यशस्वी ठरले. आज ते देशातील सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत. त्यांच्या पाच पिढ्या मूर्तिकाराच्या व्यवसायात आहेत. अरुण यांचे आजोबा बसवण्णा शिल्पीदेखील सुप्रसिद्ध मूर्तिकार होते. त्यांना म्हैसूरच्या राजाचा आश्रय मिळाला होता.

हे ही वाचा:

ईडी, सीबीआय आणि एनआयएचे पथक लंडनच्या दिशेने!

देवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…

अयोध्येत काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशाला लोकांनी केला विरोध!

धोनीही जाणार अयोध्येला!

रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

  • रामलल्लाची मूर्ती श्यामवर्णाच्या दगडाने साकारण्यात आली आहे. या दगडाचे आयुष्यमान हजारो वर्षे असते. ही मूर्ती जलविरोधी असते.
  • चंदन लावूनही या मूर्तीचा चमकदारपणा कमी होत नाही.
  • पायाच्या बोटापासून ते कपाळापर्यंत मूर्तीची उंची ५१ इंच आहे.
  • मूर्तीचे वजन १५० ते २०० किलो आहे. मूर्तीच्या वर मुकूट असेल. तर, श्रीरामाचे हात गुडघ्यापर्यंत लांब असतील.
  • कमळावर उभ्या असणाऱ्या रामाच्या हातात धनुष्यबाण असेल.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा