23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरधर्म संस्कृतीशर्टावरील अरेबिक शब्द पाहून पाकिस्तानात महिलेवर जमावाचा हल्ला

शर्टावरील अरेबिक शब्द पाहून पाकिस्तानात महिलेवर जमावाचा हल्ला

Google News Follow

Related

एक महिला तिच्या पतीसह खरेदीसाठी गेली असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना पाकिस्तानात घडली. या महिलेने जे शर्ट परिधान केले होते, त्यावर अरेबिक शब्द होते, मात्र ते शब्द म्हणजे कुराणमधील आयत असल्याचा समज करून घेत संतप्त जमाव आक्रमक झाला होता. सध्या ही महिला पाकिस्तानमधील लाहोर येथे पोलिसांच्या ताब्यात आहे.

या महिलेने हे शर्ट परिधान केल्याचे पाहताच संतप्त जमावाने हे कपडे काढून टाकण्यास तिला सांगितले, असे एक पोलिस सांगत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. तसेच, एक पोलिस ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पोलिसाचे नाव एसपी सयदा शेहरबानो नक्वी असे आहे. ती या महिलेला जमावापासून दूर करत असल्याचे दिसत आहे.

हॉटेलबाहेर संतप्त जमाव थांबलेला असताना ही महिला हॉटेलमध्ये चेहऱ्यावर हात ठेवून घाबरलेल्या मनस्थितीत दिसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या महिलेभोवती कडे केले आहे. अनेकांनी या महिलेच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत. या महिलेने परिधान केलेल्या शर्टावर साधे अरेबिक शब्द आहेत, ते शब्द कुराणमधील आयत नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर, त्यावर सुंदर या अर्थाचे अरेबिक शब्द लिहिले आहेत, त्यात धर्माबाबतचे शब्द नाहीत, असेही एकाने पोस्ट लिहून म्हटले आहे.

हे ही वाचा:

गुजरात मानवी तस्करी प्रकरणातील ‘डर्टी हॅरी’ला अमेरिकेत अटक

‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’

मराठा आंदोलन: मराठवाड्यातील इंटरनेट सेवा बंद!

राष्ट्रीय लोकदलाच्या हरयाणा अध्यक्षाची गोळी झाडून हत्या!

या व्यक्तीने त्याच शर्टाचे इन्स्टाग्राम पानावरील छायाचित्रही पोस्ट केले आहे. खास रमझान महिन्यासाठी सन २०२२मध्ये कपड्यांचे हे कलेक्शन आले होते, असेही या पोस्टमध्ये नमूद केले आहे. या घटनेनंतर या महिलेने कोणाला दुखवण्याचा आपला हेतू नसल्याचे सांगत माफीनामा सादर केला आहे. तर, तिथे उपस्थित असलेल्या मुस्लिम धर्मोपदेशकाने या महिलेने पुन्हा कधीही ते शर्ट परिधान करणार नसल्याचे वचन दिल्याचे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा