विमानतळावर ‘श्रीराम’ दिसले आणि…

रामायणात अरुण यांनी प्रभू श्री रामाची भूमिका साकारली होती. मालिकेला इतकी वर्षे होऊनही प्रेक्षकांमध्ये अरुण हे आजही राम म्हणूनच ओळखले जातात.

विमानतळावर ‘श्रीराम’ दिसले आणि…

टीव्हीवरील मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असतात पण या मालिकांप्रमाणे त्यातील पात्र देखील लोकांना आवडत असतात. अनेकदा मालिकेतील भूमिकेच्या नावानेच हे कलाकार आयुष्यभर ओळखले जातात. याचीच प्रचीती रामानंद सागर यांच्या रामायणात भगवान श्री रामची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल यांना नुकतीच आली.

रामायणात अरुण यांनी प्रभू श्री रामाची भूमिका साकारली होती. मालिकेला इतकी वर्षे होऊनही प्रेक्षकांमध्ये अरुण हे आजही राम म्हणूनच ओळखले जातात. अरुण गोविल हे संभाजीनगरच्या रामलीलाला विशेष अतिथी म्हणून पोहोचले होते. अरुण गोविल विमानतळाबाहेर येताच एका महिलेने त्यांच्या पायाशी लोटांगण घातलं. जणू त्या महिलेला रामाचे दर्शन घडले असावे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

या महिलेने अरुण गोविल यांना विमानतळावर पाहिले. ती महिला अरुण यांना पाहून भावूक झाली. ती अरुण गोविल यांच्या पाया पडू लगाली. अरुण यांनी त्या महिलेसमोर हात जोडले आणि तिला उठायला सांगितले. त्यांनी त्या महिलेसोबत फोटो देखील काढला. याचा व्हिडीओ कोणी तरी रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हे ही वाचा:

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?

फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी

… आणि काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला पूल असा झाला इतिहासजमा

ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांची फसवणूक

अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, आजही तुमची प्रतिमा लोकांच्या मनात प्रभू श्री रामाची आहे. तुम्ही महान आहात.

Exit mobile version