आपण कुठले कपडे घालावेत यासंदर्भात निर्णय घेण्याचा आम्हाला हक्क असला पाहिजे असे म्हणते हिजाब न घालणाऱ्या इराणच्या महसा अमिनी हिला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. मारहाणीत तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि नंतर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.
१३ सप्टेंबरला ही घटना घडली. सागेझ या भागात राहणारी अमिनी तेहरानला सहलीच्या निमित्ताने गेली होती. अमिनी आपला भाऊ कायराशसोबत होती. शाहिद हघानी एक्स्प्रेसवेवरून जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले आणि अमिनीला अटक केली. पोलिसांनी तिला वोझारा याठिकाणी चौकीत आणले. तिथे आधीच १२-१५ महिला होत्या. त्यांनीही हिजाब घातला नसल्यामुळे त्यांना पोलिसांनी तिथे आणले होते. तिथे या महिलांना चोप देण्यात येत होता तसेच कपड्यांसंदर्भातील नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे सांगितले जात होते.
पोलिसांनी अमिनी यांची गाडी अडविल्यानंतर तिच्या भावाने पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्याचा हात मुरगळला. त्यानंतर आम्ही तिला पोलिस ठाण्यात घेऊन जात आहोत. एका तासाने तिचे प्रबोधन केल्यानंतर तिला सोडून देऊ असे सांगितले.
हे ही वाचा:
मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार
‘प्रिन्स चार्ल्स पायउतार होतील’ कोण म्हणतंय असं
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स
जितेंद्र आव्हाड यांना ‘शासन’; म्हाडासंदर्भातील सर्व निर्णय रद्द
कायराशनेही पोलिसांच्या मागून जात ठाणे गाठले. तिथे गेल्यावर अनेक महिलांना पोलिस ठाण्यात डांबून ठेवल्याचे दिसले. काही महिलांना मारहाण करण्यात येत होती. तेव्हा आम्ही त्या पोलिस ठाण्याचे दरवाजे ठोठावले तेवढ्याच पोलिसांनी काठ्यांनी आम्हाला मारण्यास सुरुवात केली, अश्रुधूर सोडण्यात आला. अजूनही माझे शरीर काही ठिकाणी काळे पडले आहे, असे कायराश म्हणाला. कायराशने सांगितल की, पाच मिनिटांनी एक रुग्णवाहिका पोलिस ठाण्यातून बाहेर पडली. ठाण्यात एक महिला मृत्यूमुखी पडल्याचे सगळे सांगत होते. पोलिसांनी कायराशला खोटेच सांगितले की, एक पोलीस जखमी झाला आहे. पण सोडण्यात आलेल्या एका महिलेने कायराशला सांगितले की, त्याची बहीण जखमी झाली आहे. ते ऐकल्यानंतर कायराश बहिणीला बघण्यासाठी रुग्णालयात गेला. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या बहिणीला हृदयविकाराचा झटका आला आहे. तिचे हृदय धडधडत होतं पण तिचा मेंदू काम करत नव्हता.
कायराशने सांगितले की, बहिणीला झालेली मारहाण आणि त्यानंतर उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आता मला यासंदर्भात तक्रार करायची आहे पण ती वोझरा पोलिस ठाण्यात जाऊनच करायला सांगत आहेत.
पोलिसांनी आता यातून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या महिलेला आधीपासूनच हृदयाचा त्रास होता असे सांगून पोलिसांनी काखा वर केल्या आहेत.