पुढील वर्षापासून ‘पीओपी’ मूर्ती बंद होणार?

पुढील वर्षापासून ‘पीओपी’ मूर्ती बंद होणार?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. पुढील वर्षापासून या सूचनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी येण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिकेत शुक्रवारी (१ ऑक्टोबर) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींसह संबंधित प्राधिकरणच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तींसाठी नियमावली तयार केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणली आहे. घरगुती मूर्तींचे विसर्जन घरात करण्यास प्राधान्य द्यावे, असे सूचनांमध्ये म्हटले आहे. पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती बनविण्यासाठी मोठ्या आकाराच्या मंडपाची प्रदीर्घ काळासाठी आवश्यकता लागेल त्यामुळे महापालिकेने तशी परवानगी मूर्तीकारांना द्यावी, अशी विनंती बैठकीदरम्यान मूर्तिकारांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली.

हे ही वाचा:

… म्हणून एसटी बसमधील दिवे सुरूच राहणार!

एलएसीचं रक्षण करायला ‘वज्र’ तैनात

…आणि त्या चिमुकल्या बाळाचे हृदय पुन्हा चालू लागले!

अबब…लडाखमध्ये फडकला खादीचा एवढा मोठा तिरंगा

मूर्ती केवळ नैसर्गिक, जैविकदृष्ट्या विघटनशील आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या असाव्यात, मूर्तीची सजावट करताना त्यासाठी वापरण्यात येणारे रंग हे पर्यावरणपूरक असावेत, सजावटही पाना- फुलांची असावी, असे नियमावलीत म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मूर्तिकारांची नोंदणी असणे आवश्यक, मूर्ती पर्यावरणपूरक नसल्यास दोन वर्षासाठी नोंदणी रद्द, नदी, तलाव, समुद्र यांमध्ये मूर्ती विसर्जन करण्याबाबत स्वतंत्र सूचना करण्यात याव्या, असे महापालिकेसाठीच्या नियमावलीत म्हटले आहे.

बैठकीत पालिकेचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी, केंद्र सरकारच्या नीरी संस्थेचे प्रतिनिधी आणि मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version