माघी गणेशोत्सव का साजरा केला जातो?

माघी गणेशोत्सव का साजरा केला जातो?

आजपासून महाराष्ट्रात माघी गणेशोत्सवाचा प्रारंभ होत आहे. मग महिन्यातील चतुर्थीला माघी गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो. महाराष्ट्रात भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणेच हा गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माघी गणेशोत्सव साजरे होण्याचे प्रमाणे जरी कमी असले तरीही गणेश भक्तांच्या उत्साहात कोणतीच कमतरता नसते.

हिंदू पुराणानुसार भगवान गणेशाचे तीन अवतार घेतल्याचे मानले जाते. त्यातील तिसरा अवतार हा माघ चतुर्थीला जन्माला आला. त्यामुळेच या दिवशी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. माघ महिन्यातील या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा केली जाते. ही पूजा भाद्रपदातील गणेशाच्या पूजेसारखीच असते. माघी गणेशोत्सवातील गणेश मूर्ती ही मातीची अथवा धातूची असते.

हे ही वाचा:

पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे

बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक होणार?

महाराष्ट्रात अनेक कुटुंबांमध्ये माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावेळी अनेक मित्र-परिचीत, नातेवाईक, आप्तेष्ट हे या गणरायाच्या दर्शनाला येतात. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरूपातही माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळे ही उत्सव साजरी करताना दिसतात. या निमित्ताने अनेक करमणुकीचे, प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. माघी गणेशोत्सव हा किती दिवसांसाठी असावा याचे कोणतेही निकष शास्त्रात दिलेले आढळत नाहीत.

यंदाच्या वर्षी माघी गणेशोत्सवावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे आणि ओमायक्रॉनचे सावट आहे. त्यामुळे शासनाचे कोरोना प्रतिबंधक नियम पाळून महाराष्ट्रभर हा उत्सव साजरा केला जात आहे.

Exit mobile version