टिपू सुलतानमुळे कर्नाटकमधील या गावात साजरी होत नाही दिवाळी

टिपू सुलतानमुळे कर्नाटकमधील या गावात साजरी होत नाही दिवाळी

दीपावली हा सण देशभरात उत्साहात साजरा होत असताना कर्नाटकातील एका समुदायासाठी दीपावली ही टिपू सुलतानने त्यांच्यावर झालेल्या जुलामांची आणि अत्याचारांची आठवण आहे. मांड्यम अय्यंगार समुदाय नरक चतुर्दशी हा शोक दिवस म्हणून पाळतात.

नरक चतुर्दशीच्या दिवशी टिपू सुलतानच्या सैन्याने गावात घुसून या समुदायाच्या लोकांना मारण्यास सुरुवात केली आणि त्यादिवशी ८०० हून अधिक लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता. काही लोक वाचले ते शहरातून पळून गेले. साधारण हे हत्याकांड १७८३ ते १७९५ दरम्यान झाल्याचे समुदायाचे सदस्य सांगतात.

मेलूकोटे हे कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात वसलेले एक छोटेसे डोंगरात वसलेले शहर आहे. श्री रामानुजाचार्य यांच्या सुरुवातीच्या अनुयायांपैकी होयसला राजा विष्णुवर्धन यांनी संरक्षण दिल्यानंतर ते १२व्या शतकात मेलूकोटे येथे स्थायिक झाले होते.

हे ही वाचा:

गुरुग्राममध्ये रस्त्यावरील नमाजावरून राडे

त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळली नाही

उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ

दिल्ली सीमेवर तणाव निवळला?

टिपू सुलतानने केलेल्या हत्याकांडामुळे आजही दिवाळीच्या पहिल्या दिवशी या समुदायाची लोक दिवे लावत नाहीत. हत्याकांड झाले तेव्हा या समुदायाची लोक मंदिरात पूजा करत होते. तेव्हा टिपू सुलतानाने निशस्त्र लोकांना मारण्याचे आदेश दिले. तसेच त्या सर्वांचे मृतदेह चिंचेच्या झाडांना लटकवून ठेवले होते. जी झाडे अजूनही त्या मंदिराच्या परिसरात आहेत, असे मेलूकोटे संस्कृत महाविद्यालयाचे एस एन सिन्हा यांनी सांगितले.

Exit mobile version