म्हैसूरमधील कॉलेज आले दबावाखाली; गणवेशाचा नियमच काढून टाकला

म्हैसूरमधील कॉलेज आले दबावाखाली; गणवेशाचा नियमच काढून टाकला

हिजाब वाद प्रकरणी सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान म्हैसूरमधील एका खाजगी महाविद्यालयाने आपला ड्रेस कोड रद्द केला आहे. मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून यावे यासाठी महाविद्यालयाने हे पाऊल उचलले आहे. आता कोणाच्यातरी दबावाखाली येऊन असे पाऊल उचलले गेले आहे की हिजाबचा वाद निर्माण होऊ नये म्हणून असा निर्णय घेण्यात आला आहे, असा प्रश्न आता या कॉलेजवर उपस्थित केला जात आहे.

हिजाब वादाचे प्रकरण हायकोर्टात असून त्यावर सुनावणी सुरू असताना कॉलेजला असे पाऊल उचलावे लागल, याचे नेमके कारण काय होते? म्हणजेच आता हिंदू समाजाचे विद्यार्थीही भगवे कपडे घालून येऊ शकतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

म्हैसूरच्या डीडीपीयूचे डीके श्रीनिवास मूर्ती यांनी सांगितले की, चार विद्यार्थिनींनी हिजाबशिवाय कॉलेजमध्ये जाण्यास नकार दिला. त्यानंतर मी या महाविद्यालयाला भेट दिली. यादरम्यान कॉलेज प्रशासनाने येथे लागू केलेला गणवेश रद्द केला. दरम्यान, शुक्रवारी एक विद्यार्थिनी शाळेत कपाळावर टिकली लावून आली असता महाविद्यालय प्रशासनाने तिला प्रवेश नाकारला.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्र्यांनी शिवनेरी नाही, निदान शिवाजी पार्कमध्ये तरी उपस्थित राहायला हवे होते’

अफगाण हिंदू-शीख शिष्टमंडळाने भेट घेऊन पंतप्रधान मोदींचे मानले आभार

भाजपच्या कार्यक्रमाला गेले म्हणून शिवसेना आमदाराने मारले भावजयीला

गोरेगाव मध्ये राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयपुरा जिल्ह्यातील इंडी शाळेच्या प्राचार्यांनी कपाळावर टिकली लावलेल्या हिंदू विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला आणि तिला गेटवरच थांबवले. यानंतर विद्यार्थिनीला सांगण्यात आले की, तू टिकली काढल्यानांतरच शाळेत प्रवेश करू शकते. यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मूळ परंपरेवर शंका घेतली जाऊ शकत नाही. त्याचवेळी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. या संदर्भात श्री राम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version