कर्नाटक उच्च न्यायालयाने वकिलांना सुनावले
हिजाबच्या मुद्द्यावरून सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात हिजाबच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या विद्यार्थीनींच्या वतीने वकील आपली बाजू मांडत आहेत. त्यातील एक वकील डॉ. विनोद कुलकर्णी यांनी या सुनावणीदरम्यान असा दावा केला की, पवित्र कुराणात असे नमूद केले आहे की, महिलांनी आपले डोके, मान दिसू नये या पद्धतीने हिजाबचा वापर करावा. त्यावर न्यायाधीश अवस्थी म्हणाले की, कुराणात हे नेमके कुठे म्हटले आहे? जोपर्यंत तुम्ही ते दाखवत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर कसा काय विश्वास ठेवायचा? तेव्हा वकील कुलकर्णी म्हणाले की, मी आता माझ्यासोबत कुराणची प्रत आणलेली नाही. पण सुनावणीच्या नंतरच्या टप्प्यात मी ते दाखवेन. तेव्हा न्यायाधीश अवस्थी म्हणाले की, जोपर्यंतच तुम्ही ते दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही तुमचे म्हणणे स्वीकारणार नाही.
तेव्हा कुलकर्णी म्हणाले की, हिजाबवर बंदी म्हणजे कुराणवर बंदी. तेव्हा अवस्थी म्हणाले की, हिजाब आणि कुराण हे तुमच्यासाठी सारखेच आहे का? तेव्हा कुलकर्णी म्हणाले की, माझ्यासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी हे आहे. मी एक ब्राह्मण हिंदू आहे आणि कुराण हे जगातील सगळ्या मुस्लिम समाजासाठी लागू होते. तेव्हा न्यायाधीश अवस्थी म्हणाले की, हिजाबवर बंदी तर घातलेली नाही. त्यावर वकील कुलकर्णी म्हणाले की, तर हिजाबला बंदी घातली गेली तर ते कुराणला बंदी घातल्यासारखेच होईल. त्यामुळे निष्कारण वाद निर्माण होईल.
हे ही वाचा:
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशी
हॅशटॅग अरेस्ट राणा ट्विटरवर होतोय ट्रेंड
पत्रकारपरिषदेनंतर नारायण राणेंना मुंबई महापालिकेकडून नोटीस
चन्नी यांच्या ‘भैय्या’ वादावर मनीष तिवारी ‘हे’ बोलले…
हिजाब नसेल तर मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम
वकील कुलकर्णी म्हणाले की, शुक्रवार हा मुस्लिमांसाठी पवित्र दिवस असतो त्यादिवशी तसेच रमझानमध्ये हिजाब घालण्याची परवानगी देण्यात यावी. तेव्हा न्यायाधीश अवस्थी म्हणाले की, तुम्ही तर याचिकेत विनंती केली आहे की, त्यांना गणवेश घालण्याचे आदेश द्या. त्यावर कुलकर्णी म्हणाले की, दुसऱ्या विनंतीत त्यांना हिजाब घालण्याचीही परवानगी द्या, असेही म्हटले आहे. त्यावर न्यायाधीश अवस्थी म्हणाले की, तुमच्या या दोन्ही अपेक्षा परस्परविरोधी आहेत.
तेव्हा कुलकर्णी म्हणाले की, हिजाब नसल्यामुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. सार्वजनिक व्यवस्था व आरोग्य किंवा नीतिमत्ता यांच्याविरोधात हिजाब नाहीच आहे.