25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरधर्म संस्कृतीओणम म्हणजे काय? कसा साजरा करतात?

ओणम म्हणजे काय? कसा साजरा करतात?

Google News Follow

Related

मल्याळम हिंदूंसाठी महत्वाचा सण म्हणजे ओणम. हा सण जगभरातील मल्याळम बांधवांकडून धुमधडाक्यात साजरा केला जातो. ओणम म्हणजे केरळच्या नवीन वर्षाची सुरुवात. बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक अख्यायिका सांगितली जाते. बळीराजाच्या आगमनानिमित्त आज त्याच्या स्वागतासाठी ओणमचा सण साजरा करण्यात येतो.

दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवातील महत्वाचा दिवस म्हणजे ओनम. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते. या वर्षी हा सण २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक अख्यायिका सांगितली जाते. बळीराजा आपल्या न्यायीपणाबद्दल, पराक्रमाबद्दल आणि प्रजेवरील प्रेमाबद्दल प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याच्या आगमनाचा उत्सव हा ओनमच्या स्वरुपात साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी सर्व लोक नवनवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी लोक पहाटे स्नान करुन देवदर्शन करतात. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते आणि भलीमोठी रांगोळी काढली जाते. ओनमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखतात. पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषत: केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं.

हे ही वाचा:

भारतात लवकरच ईव्ही चार्जिंगचे जाळे

पाकिस्तानच्या ग्वादारमध्ये बॉम्बहल्ला, चीनचे ८ नागरिक ठार

मी असतो तर ही वेळच आली नसती

तालिबानचा ‘या’ प्रांतात पराभव

विष्णूने वामन अवतार धारण करुन बळीराजाला पाताळात ढकलले. बळीराजाने वचनपूर्तीसाठी आपले प्राणही दिले. बळीराजाच्या या त्यागावर खुश होऊन विष्णूने त्याला वरदान मागण्यास सांगितले. त्यावर बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ओनमच्या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असं समजलं जातं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा