33 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरधर्म संस्कृतीअखंड भारत संकल्प दिन म्हणजे नेमके काय रे भाऊ?

अखंड भारत संकल्प दिन म्हणजे नेमके काय रे भाऊ?

Google News Follow

Related

१४ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतीय इतिहासातील एक काळा दिवस ठरला. कारण त्याच दिवशी या परमपवित्र अश्या भारत भूमीचे धर्माच्या आधारे विभाजन करण्यात आले. काही मोजक्या कट्टरतावादी लोकांच्या स्वार्थी मागणी समोर या देशातील अनेक दिग्गद नेत्यांनी नमते घेतले. या वेळी लाखो देशवासियांच्या भावना पायदळी तुडवल्या गेल्या. पाकिस्तान नावाचा एक नवा देश तयार करण्यात आला. ही भळभळणारी जखम या देशाच्या माथी मारली गेली. जी जखम आज ७५ वर्षांनंतरही ताजी आहे.

दरवर्षी १४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानमध्ये त्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असतानाच भारतभर मात्र अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लाखो नागरिक या कार्यक्रमांत सहभाग नोंदवतात. ज्यामध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. हे पूजन म्हणजे भारताच्या आजच्या भौगोलिक नकाशपर्यंत मर्यादित नसून अखंड भारताचा जो सांस्कृतिक नकाशा आहे त्याचे पूजन केले जाते.

हे ही वाचा:

पर्यावरण संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

तालिबान अफगाणिस्तानवर कब्जा करण्याच्या उंबरठ्यावर

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला

मुंबई महापालिकेत बदल्या, बढत्यांमध्ये घोटाळा?

यावेळी प्रबोधन पर व्याख्यान आयोजित केली जातात. ज्याच्या माध्यमातून उपस्थितांना अखंड भारताचा इतिहास, त्याचे महत्त्व, सध्याच्या काळातील त्याची गरज याची माहिती दिली जाते. तर त्याचवेळी अखंड भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शपथ सुद्धा घेतली जाते.

देशभरातील राष्ट्रप्रेमी संघटना जसे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद अशा अनेक संघटनांच्या मार्फत हा अखंड भारत संकल्प दिवस दर वर्षी साजरा केला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा