उत्तर प्रदेशातील संभल येथे असलेल्या जामा मशिदीचा वाद विकोपाला गेला असून हिंसाचार उफाळून आला आहे. न्यायालयाने सर्वेक्षणाचे निर्देश दिल्यानंतर रविवारपासून येथे हिंसाचार सुरू असून यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. एकीकडे सरकार आणि प्रशासन परिस्थिती हाताळण्यात व्यस्त असताना संभल येथील जामा मशीद म्हणजे हरिहर मंदिर होते का या चर्चांना सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक पुरावे काय सांगतात याकडे लक्ष वेधले आहे. अशातच ‘आज तक’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआयच्या १८७५ च्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे आहेत. ‘टूर्स इन द सेंट्रल दोआब आणि गोरखपूर १८७४-१८७५ आणि १८७५-१८७६’ या शीर्षकाखाली प्रकाशित अहवालात संभलच्या जामा मशिदीचे तपशीलवार सर्वेक्षण आहे. अहवालानुसार, मशिदीच्या आतील आणि बाहेरील खांब जुन्या हिंदू मंदिरांचे असल्याचे सांगितले जाते, ज्यांना प्लास्टर लावून लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जेव्हा मशिदीच्या एका खांबावरून प्लास्टर काढले गेले तेव्हा लाल रंगाचे प्राचीन खांब दिसत होते, जे हिंदू मंदिरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या समान रचना आणि संरचनेचे होते.
एएसआय सर्वेक्षणाने असा दावा केला आहे की, मशिदीमध्ये अनेक चिन्हे आणि अवशेष आहेत जे पुरातनकाल आणि हिंदू मंदिराशी संबंध दर्शवतात. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, सर्वेक्षणाचे ताजे निष्कर्ष २९ नोव्हेंबर रोजी न्यायालयात सादर केले जाणार आहेत. या अहवालातून पुढील सत्यता स्पष्ट होईल. संभलच्या शाही जामा मशिदीबाबत हिंदू पक्षाचा दावा आहे की ती प्राचीन हिंदू मंदिर पाडून बांधण्यात आली होती. हा दावा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि ऐतिहासिक पुराव्यांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या १८५७ च्या अहवालात या मशिदीतील एक शिलालेख हा सर्वात मोठा पुरावा म्हणून नमूद करण्यात आला आहे. अहवालानुसार, मशिदीमध्ये एक शिलालेख आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की त्याचे बांधकाम मीर हिंदू बेगने ९३३ हिजरीमध्ये पूर्ण केले होते. मीर हिंदू बेग हा बाबरचा दरबारी होता, ज्याने हिंदू मंदिराचे मशिदीत रूपांतर केले. एएसआयच्या म्हणण्यानुसार, हा शिलालेख हिंदू धार्मिक स्थळाच्या जागी मशीद बांधण्यात आल्याचा पुरावा आहे. याशिवाय मशिदीचे हिंदू खांब हे मुस्लिम खांबांपेक्षा वेगळे आहेत आणि ते हिंदू स्थापत्यकलेचे प्रतीक आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या मते, हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या काळात मशिदीच्या घुमटाचे नूतनीकरण करण्यात आले. मशिदीच्या संरचनेत अनेक हिंदू मंदिर चिन्हे सापडली, जी नंतर प्लास्टरने झाकली गेली.
हेही वाचा..
म्हणे पराभवाला माजी सरन्यायाधीश जबाबदार
पर्थचा अभेद्य किल्ला भेदला! भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी ऐतिहासिक विजय
१३२ सीट, स्ट्राईक रेट ८९ टक्के, मुख्यमंत्री म्हणून भाजपचा चेहरा फडणवीसच!
संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार झियाउर बुर्क यांच्यावर गुन्हा दाखल
हिंदू बाजूचे याचिकाकर्ते हरिशंकर जैन यांनी त्यांच्या याचिकेत बाबरनामाचा उल्लेख केला आहे. बाबरनामाच्या पान ६८७ वर लिहिले आहे की, बाबरच्या आदेशानुसार त्याचा दरबारी मीर हिंदू बेग याने संभलच्या हिंदू मंदिराचे जामा मशिदीत रूपांतर केले. हे वर्णन शिलालेखाशी जुळते, ज्यामध्ये मीर हिंदू बेगचे नाव आणि ९३३ हिजरी मशिदीच्या बांधकामाचा उल्लेख आहे.