लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. पण दोन प्रेमी युगुलांची लग्नाची गाठ स्वर्गात नाही तर चक्क रशिया- युक्रेन युद्धामध्ये बांधली गेली आहे. या दोन्ही देशांमध्ये झालेल्या घनघोर युद्धाने सर्वांच्याच अंगावर काटा आला. या युद्धात अनेक जण बेघर झाले, स्फोटात अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले. दोन्ही देश अजूनही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून युद्धाचे वातावरण अजूनही सामान्य होण्याची चिन्हे नाहीत. पण या युद्धाच्या महाभयानक वातावरणात रशियाचा सर्गेई नोविकोव आणि युक्रेनची एलोना ब्रामोका दोघांमध्ये मात्र याच काळात प्रेम फुलत होते. या प्रेमांचे रुपांतर अखेर लग्नात झाले. सर्गेई आणि एलोना यांचा हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे नुकताच विवाह झाला. या विवाहाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या या अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
युद्धाच्या वातावरणाताच दोघांमध्ये प्रेम फुलत होते. पण ते व्यक्त होत नव्हते. अखेर काहीच दिवसांपूर्वी दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाचा ‘इझहार’ केला. रशिया- युक्रेनमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या वातावरणापासून दूर जात विवाहाची रेशीम गाठ गुंफावी असा विचार दोघांनी केला. हे जोडपे २ ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे आले. स्थानिक लोकांकडून या जोडप्याला भरभरून आधार मिळाला. तिकडे रशिया-युक्रेनमध्ये हल्ल्यांचे आवाज येत असताना दुसरीकडे हिमाचलच्या निसर्गरम्य वातावारणात सनई – चौघड्याचे सूर आसमंतात निनादत होते.
#WATCH | Himachal Pradesh: Sergei Novikov, a Russian national tied the knot with his Ukrainian girlfriend Elona Bramoka in a traditional Hindu ceremony in Dharamshala on August 2. pic.twitter.com/0akwm2ggWr
— ANI (@ANI) August 5, 2022
हे ही वाचा:
राहुल गांधी, प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी
हिंदु पद्धतीने झाला विवाह सोहळा
लग्नामध्ये एलोनाने लाल रंगाची साडी घातलेली असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. येथील ग्रामीण गीतांच्या तालावर लग्नाचे फेरे झाले. मुख्य म्हणजे या दोघांनीही हिंदू रितीरिवाजानुसार पवित्र बंधनात अडकले. रशियाच्या सर्गेई याने आता इस्त्रायलचे राष्ट्रीयत्व पत्करले आहे. या अनोख्या विवाहाची धर्मशालामध्येही चर्चा रंगली आहे.