हिंदुहितासाठी, राष्ट्रहितासाठी करा १०० टक्के मतदान !

एक है तो सेफ है, हा मंत्र लक्षात ठेवा

हिंदुहितासाठी, राष्ट्रहितासाठी करा १०० टक्के मतदान !

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीस आता फक्त एक आठवडा राहिला आहे. महाराष्ट्रातील २०२४ची विधानसभेची निवडणूक, ही सामान्य निवडणूक नसून, अनेक प्रकारे महत्वाची आहे. ही हिंदुहित, राष्ट्रहित आणि महाराष्ट्राचा विकासासाठीची एक महत्वपूर्ण अशी निवडणूक आहे. ही निवडणूक राष्ट्रीय अस्मिता, भारतीय संस्कृती, सनातन धर्म आणि हिंदुत्वाच्या अस्तित्वासाठीची निवडणूक आहे. आपली संस्कृती, सभ्यता वाचावी या साठीची एक महत्वपूर्ण अशी निवडणूक आहे.

हिंदुहित आणि राष्ट्रहितासाठी १०० % मतदान व्हावे या हेतूने, आपण सर्वांनी आपल्या सम्पूर्ण परिवार, मित्र, आप्तेष्ट आदी सर्वांशी सम्पर्क करावा. आपले व्यक्तिगत हेवेदावे, स्वार्थ, ईर्षा सोडून, सर्वांनी “एक है तो नेक है आणि एक है तो सेफ है” हे लक्षात घेऊन, हिंदुहिताचे काम करणाऱ्याला मतदान करावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा.

नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ९३.८७% मुस्लिमांनी मतदान केले आणि ५७.३३% हिंदूंनी मतदान केले. ह्याचा अर्थ ४२.६७% हिंदूंनी मतदान केले नाही. अशाच प्रकारचा ट्रेंड हा राजस्थान, पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेश आणि अन्य काही राज्यामध्येही आढळून आला. सर्वसाधारण पणे ६% मुस्लिमांनी आणि ४३%हिंदूंनी मतदान न केल्याचे आढळून आले. साधारणत: ज्या ६०% हिंदूंनी मतदान केले, त्यांनी जातपात आणि अन्य काही मुद्यावर मतदान केले आणि त्यामुळे त्या मतांची आणखी विविध प्रकारे विभागणी झाली. साधारणत: हीच स्थिती सर्व देशामध्ये आढळून आली आहे.

हे ही वाचा:

‘व्होट जिहाद’ साठी पैशांचा वापर

हा तर बालीशपणा, उद्धव ठाकरेंच्या प्रचारांवर बंदी आणावी!

ट्रम्प टीममधील भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी आहेत कोण?

हैद्राबादच्या निजामाचे अत्याचार, कुटूंबाचा त्याग खर्गे मतांसाठी विसरून गेले!

या विरुद्ध ९४% मुस्लिमांनी ठरवून निःसंदेह भाजपा विरोधात मतदान केले. ज्या ४०% हिंदूंनी मतदान नाही केले, ते बऱ्याच प्रमाणात सुशिक्षित असून विशेष म्हणजे यातील काहीजण भाजपा समर्थक पण होते आणि समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात मोदी समर्थक होते, परंतु महत्वाचे मत द्यायचे कर्तव्य त्यांनी बजावले नाही.

निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर त्यांना न दिलेल्या मताचे नुकसान लक्षात आले, पण वेळ निघून गेली होती. किमान या निवडणुकीत तरी आपण सर्वांनी १००% मतदान होण्यास मदत करूया…

या निवडणुकीत खालील बाबींवर विशेष लक्ष द्यावे:
– शत-प्रतिशत मतदान
– हिन्दू हित का शासन
– नोटा को नो-नो
– फेक नॅरेटिव्ह को मूठमाती
– सजग रहो

दिनांक २० नोव्हेंबर २०२४, “पहिले मतदान फिर जलपान”. भविष्यातील धोके ओळखून, हिंदुहितासाठी मतदान करण्याचे आव्हान, अखंड भारत व्यासपीठाचे अध्यक्ष संजय ढवळीकर यांनी एका कार्यक्रमात, उपस्थित जनसमुदायाला केले आहे.

Exit mobile version