‘पश्चिम बंगाल बनत आहे मिनी काश्मीर’

विवेक रंजन अग्निहोत्रींची ममता सरकारवर टीका

‘पश्चिम बंगाल बनत आहे मिनी काश्मीर’

प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांची आगामी फिल्म ‘द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर’ प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. या दरम्यान, अग्निहोत्रींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (Twitter) वर पश्चिम बंगालमधील ममता बनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारच्या काळात पश्चिम बंगाल हा मिनी काश्मीर होत असल्याची भीती अग्निहोत्री यांनी व्यक्त केली.

अग्निहोत्री यांनी पुढील कारणे दिली आहेत-

सरकारद्वारे प्रायोजित लोकसंख्याशास्त्रीय (Demographic) बदल हा एक वास्तव आहे.
बंगालचे १९०५ मध्ये धार्मिक आधारावर विभाजनही लोकसंख्याशास्त्राच्या बदलामुळे झाले होते.
‘डायरेक्ट ऍक्शन डे’ (१९४६) मध्ये ४० हजार हिंदूंची हत्या झाली, ज्यामागे डेमोग्राफीचा मोठा हात होता.
नौखाली येथे हजारो हिंदूंची हत्या, महिलांवर बलात्कार आणि सक्तीने धर्मांतर करण्यात आले. यामागेही लोकसंख्याशास्त्रीय बदल कारणीभूत होता.
बंगालच्या विभाजनात रक्तपात आणि क्रूरतेचा इतिहास आहे, जो डेमोग्राफिक बदलामुळे घडला.
बंगालमध्ये काही राजकीय माफिया हे डेमोग्राफी बदलण्यासाठी आणि ममता सरकारच्या मदतीने मतदार बदलण्यासाठी कार्यरत आहेत.
परिणामी, बंगाल पुन्हा एकदा मिनी काश्मीर बनण्याच्या दिशेने जात आहे.

हे ही वाचा:

महागाई कमी झाल्याने व्याजदरात कपात होणार!

बंगाल भर्ती घोटाळा प्रकरणात पार्थ चॅटर्जींचे जावई बनले माफीचे साक्षीदार

‘सनातन धर्माव्यतिरिक्त कुठेही समृद्ध सण, उत्सवांची परंपरा नाही!’

मणिपूरमध्ये पोलिसांना मोठे यश, चार दहशतवाद्यांना अटक!

विवेक अग्निहोत्रींनी याआधी सांगितले होते की, “‘द कश्मीर फाइल्स’ने लोकांना व्यथित केले, पण ‘द दिल्ली फाइल्स’ त्याहून अधिक हादरवून टाकेल!”

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनावर आधारित चित्रपट होता. ‘द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर’ हा १९४६ मधील कोलकाता दंगलीवर आधारित चित्रपट असेल.

विवेक अग्निहोत्रींनी आपल्या चित्रपटांच्या उद्दिष्टांबद्दल सांगितले की, “माझ्या आयुष्याचा उद्देश म्हणजे इतिहासातील काळोख्या, दडवलेल्या आणि कथन न केलेल्या सत्यांना समोर आणणे हे आहे. त्या कहाण्या जरी ती कितीही अस्वस्थ करणारी असली तरीही, त्या दाखविल्या गेल्या पाहिजेत.

‘द कश्मीर फाइल्स’ हा केवळ चित्रपट नव्हता, तर एक क्रांती होती. तो अन्यायाविरोधातील एक लढाई होती, असेही ते म्हणाले.

Exit mobile version