‘द सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ पुस्तक आता मराठीत

सनातन धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणाऱ्या विवान कारुळकरच्या पुस्तकाची मोठी भरारी

‘द सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ पुस्तक आता मराठीत

द सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस हे विवान कारुळकर याने लिहिलेले पुस्तक आता मराठीतही प्रकाशित झाले आहे. ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ या नावाने हे वाचनीय असे पुस्तक आता सगळीकडे उपलब्ध झाले आहे. नवी दिल्लीत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या संसद सम्मान समारोह या कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नवी दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम नुकताच पार पडला.

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी विवानने हे पुस्तक सखोल संशोधन करून लिहिले आहे. त्याची पहिली इंग्रजी आवृत्ती जानेवारी २०२४ला प्रकाशित झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच मराठीतही हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मराठीतील या पुस्तकाचीही ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमातील उपस्थितांनी स्तुती केली. या कमी वयात त्याने या विषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल सर्वांनीच त्याला शाबासकीची थाप दिली. ऍमेझॉनवर हे पुस्तक आता उपलब्ध आहे.

 

प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर तसेच प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र असलेल्या विवानने लिहिलेल्या या पुस्तकाला भारतातच नव्हे तर परदेशातही अतिशय चांगला प्रतिसाद लाभला. त्यानंतर मराठीतही आता हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

कमी वयात असे पुस्तक लिहिल्याबद्दल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विवानच्या नावाचा समावेश याआधीच झालेला आहे.

‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने या पुस्तकाची आणि विवान कारुळकर याच्या लिखाणाची दखल घेतली. सनातन धर्मावर लिहिणारा सर्वात तरुण लेखक म्हणून विवानने इतिहास रचला आहे. त्याच्या या विक्रमी कामगिरीला ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने अधिकृतरीत्या मान्यता दिली आहे. ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून त्याला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून विवान याला त्याच्या कौतुकास्पद कामासाठी बॅज आणि नाणे देण्यात आले. विशेष म्हणजे ही नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. नुकत्याच झालेल्या ब्रिटनमधील विवानच्या या पुस्तकाची चर्चा होत होती. विद्यमान पंतप्रधान केअर स्ट्रॅमर यांनीही त्यावेळी विवानच्या पुस्तकाची तारीफ केली होती.

 

भारतीय सेनादलाने विवानला धार्मिक साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल पदक देऊन गौरविले होते. अवघ्या १७व्या वर्षी विवानने हा सन्मान प्राप्त केला आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले.

‘नासा’तील शास्त्रज्ञ मोहम्मद सैदुल अहसान व मोहम्मद सैफ आलम यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले. त्यांना हे पुस्तक प्रदान करण्यात आले. विवानचे पुस्तक स्वीत्झर्लंडमध्येही पोहोचले. स्वीत्झर्लंडच्या संसदीय समितीचे प्रमुख डॉ. निक गुग्गर यांनी विवानच्या या लेखनाचे कौतुक केले.

हे ही वाचा:

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रद्दच करा!

बांगलादेशींचा छुप्यापद्धतीने भारतात घुसण्याचा प्रयत्न, बीएसएफने ११ जणांना पकडले !

अखंड भारताच्या फाळणीचा जाणून घ्या खरा इतिहास, स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तकांवर २० टक्क्यांची सवलत !

बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या आत्याचाराविरोधात सांगलीत निषेध सभा

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनीही विवानचे या पुस्तकाबद्दल तोंडभरून कौतुक केले होते. जैन धर्माचे आचार्य महाश्रमणजी यांनीही पुस्तक पाहून विवानला भरपूर आशीर्वाद दिले. भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, सुशील कुल्हारी, राजस्थानचे आयकर खात्याचे प्रिन्सिपल डायरेक्टर सुधांशू शेखर झा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण परदेशी, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जितो संघटनेचे प.पू. गुरुदेव नयपद्मसागरजी, कस्टम विभागाचे आयुक्त अस्लम हसन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खासगी सचिव एस. के. जाधव यांनीही विवानच्या या प्रयत्नाबद्दल त्याला शाबासकीची थाप दिली.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनीही या पुस्तकाचे खूप कौतुक केले आहे. तसेच प्रभू श्रीरामाच्या चरणांपाशी हे पुस्तक ठेवून भगवंतांचे आशीर्वादही घेतले आहेत. चंपतराय यांनी पुस्तकाबद्दल आपल्या भावना पहिल्या पानावर लिहिल्या असून त्यातून विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

 

 

Exit mobile version