30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरधर्म संस्कृती‘सनातन धर्म…’ च्या मराठी आवृत्तीचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन

‘सनातन धर्म…’ च्या मराठी आवृत्तीचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन

विवान कारुळकरच्या पुस्तकाला मिळतो आहे भरघोस प्रतिसाद

Google News Follow

Related

कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर याच्या sanatan dharma : True source of all sciences या पुस्तकाच्या ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन लालबागचा राजाच्या दरबारात झाले. प्रशांत कारुळकर यांनी ९ सप्टेंबरला लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, तेव्हा या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीची प्रत लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आली.

विवान कारुळकरचे हे पुस्तक तीन भाषात प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला भरघोस प्रतिसाद लाभत असून या पुस्तकाच्या इंग्रजीतील आणि पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन अयोध्येतील राम मंदिरात झाले होते. राम मंदिर ट्रस्टचे चंपतराय यांनीही या पुस्तकाबद्दल कौतुकोद्गार काढले होते.

नीलिमा देशपांडे यांनी मराठीतील या आवृत्तीचे भाषांतर केले आहे.

प्रशांत कारुळकर यांनी लालबागच्या राजाच्या कार्यकारिणीचे या भेटीच्या निमित्ताने आभार मानले आहेत. अक्षय यांनी ही भेट घडवून आणली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

कमी वयात असे पुस्तक लिहिल्याबद्दल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विवानच्या नावाचा समावेश याआधीच झालेला आहे. ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने या पुस्तकाची आणि विवान कारुळकर याच्या लिखाणाची दखल घेतली. सनातन धर्मावर लिहिणारा सर्वात तरुण लेखक म्हणून विवानने इतिहास रचला आहे. त्याच्या या विक्रमी कामगिरीला ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने अधिकृतरीत्या मान्यता दिली आहे. ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून त्याला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

 

लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून विवान याला त्याच्या कौतुकास्पद कामासाठी बॅज आणि नाणे देण्यात आले. विशेष म्हणजे ही नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. नुकत्याच झालेल्या ब्रिटनमधील विवानच्या या पुस्तकाची चर्चा होत होती. विद्यमान पंतप्रधान केअर स्ट्रॅमर यांनीही त्यावेळी विवानच्या पुस्तकाची तारीफ केली होती.

 

भारतीय सेनादलाने विवानला धार्मिक साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल पदक देऊन गौरविले होते. अवघ्या १७व्या वर्षी विवानने हा सन्मान प्राप्त केला आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले. ‘नासा’तील शास्त्रज्ञ मोहम्मद सैदुल अहसान व मोहम्मद सैफ आलम यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले. त्यांना हे पुस्तक प्रदान करण्यात आले. विवानचे पुस्तक स्वीत्झर्लंडमध्येही पोहोचले. स्वीत्झर्लंडच्या संसदीय समितीचे प्रमुख डॉ. निक गुग्गर यांनी विवानच्या या लेखनाचे कौतुक केले.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अटक करा’

अमित शहांसह भाजपाचे प्रमुख नेते लालबागच्या राजाचरणी

सोनसाखळी चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनीही विवानचे या पुस्तकाबद्दल तोंडभरून कौतुक केले होते. जैन धर्माचे आचार्य महाश्रमणजी यांनीही पुस्तक पाहून विवानला भरपूर आशीर्वाद दिले. भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, सुशील कुल्हारी, राजस्थानचे आयकर खात्याचे प्रिन्सिपल डायरेक्टर सुधांशू शेखर झा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण परदेशी, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जितो संघटनेचे प.पू. गुरुदेव नयपद्मसागरजी, कस्टम विभागाचे आयुक्त अस्लम हसन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खासगी सचिव एस. के. जाधव यांनीही विवानच्या या प्रयत्नाबद्दल त्याला शाबासकीची थाप दिली.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनीही या पुस्तकाचे खूप कौतुक केले आहे. तसेच प्रभू श्रीरामाच्या चरणांपाशी हे पुस्तक ठेवून भगवंतांचे आशीर्वादही घेतले आहेत. चंपतराय यांनी पुस्तकाबद्दल आपल्या भावना पहिल्या पानावर लिहिल्या असून त्यातून विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा