सनातन धर्म…च्या गुजराती आवृत्तीचे केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या हस्ते शानदार प्रकाशन

विवान कारुळकरच्या पुस्तकाच्या आता चार भाषांत आवृत्त्या

सनातन धर्म…च्या गुजराती आवृत्तीचे केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या हस्ते शानदार प्रकाशन

अवघ्या १६व्या वर्षी ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानांचा खरा स्रोत’ या विषयावर पुस्तक लिहिणाऱ्या विवान कारुळकरच्या या पुस्तकाची गुजराती भाषेतील आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. “સનાતન ધર્મ: સર્વ વિજ્ઞાનનું ઉદગમસ્થાન” असे या पुस्तकाचे नाव आहे.

इंग्रजी, हिंदी, मराठीनंतर आता गुजरातीत ही आवृत्ती प्रकाशित झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या हस्ते सूरत येथे गुजराती आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसेच विवानच्या मातोश्री शीतल कारुळकरही यावेळी उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी या महत्त्वाच्या विषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल विवानचे खूप कौतुक केले तसेच त्याने आणखीही काही भाषांमध्ये हा विषय लोकांपर्यंत न्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या लहान वयात त्याने हा यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल त्याला शाबासकीही दिली. हे पुस्तक लिहिण्यामागील भूमिकाही त्यांनी विवानशी संवाद साधून जाणून घेतली. केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी पुस्तक प्रकाशनासाठी वेळ दिल्याबद्दल कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांनी त्यांचे आभार मानले.

हे ही वाचा:

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं….

उपरकोट जामा मशीद मंदिराच्या जागेवर बांधल्याचा दावा

प्रियांका वाड्रा चांगल्या, राहुल गांधी शिष्ट!

लॉस एंजेलीसमधील आगडोंबामुळे १ लाख लोकांना घर सोडण्याच्या सूचना

याआधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानांचा खरा स्रोत’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याशिवाय, द सनातन धर्म : ट्रू सोर्सेस ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस हे पुस्तकही मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आले होते.

विवानच्या पुस्तकाचे देशभरात तसेच विदेशातही खूप कौतुक झाले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवानच्या या पुस्तकाचे कौतुक केले असून त्याला प्रोत्साहन दिले आहे.

वेदांमध्ये जे लिहिले आहे ते आजचे विज्ञान आहे, असा मतितार्थ या पुस्तकातून विवानने मांडला आहे. विज्ञान आणि सनातन धर्म यांचा संबंध नाही असा दुष्प्रचार करणाऱ्यांना विवानने आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे तसेच नवी पिढी विज्ञानाबरोबरच भारतीय संस्कृती, परंपरा याकडेही सकारात्मक पद्धतीने पाहते हेदेखील त्याने आपल्या या लेखनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

हरियाणामधील गुरूग्राम येथील एसजीटी विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये द सनातन धर्म : ट्रू सोर्सेस ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये ‘नॅशनल कॉन्फरेन्स फॉर रिसर्च स्कॉलर्स ऑफ भारतीय शिक्षण मंडळ युवा आयाम, विविभा २०२४’ कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन पार पडले होते.

Exit mobile version