विवान कारुळकर याने वयाच्या १६ व्या वर्षी ‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स’ हे सनातन धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परसंबंधांवरील तसेच विज्ञानाचे खरे मूळ हे सनातन धर्मातच आहे हे सांगणारे पुस्तक लिहिले आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जगभरातून त्याच्या पुस्तकाची दखल घेतली जात असून आता विवानच्या या कामाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्येही झाली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विवान याने लिहिलेल्या ‘सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ या पुस्तकाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून अनेक दिग्गजांकडून कौतुकाची थापही मिळत आहे. अशातच आता ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने या पुस्तकाची आणि विवान कारुळकर याच्या कामाची दखल घेतली आहे. सनातन धर्मावर लिहिणारा सर्वात तरुण लेखक म्हणून विवानने इतिहास रचला आहे. त्याच्या विक्रमी कामगिरीला ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने अधिकृतरीत्या मान्यता दिली आहे. ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून त्याला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यानंतर विवानवर सर्वच स्तरांवरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावार प्रशांत कारुळकर यांनी सर्वांचे आभार मानले असून पालक म्हणून, विवानच्या अतुलनीय प्रवासाचे साक्षीदार होणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच विवानच्या या यशात त्याला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मनाले आहोत.
काही दिवसांपूर्वीचं ‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स’ या विवानच्या पुस्तकाची दखल थेट लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून घेण्यात आली होती. विवान याला त्याच्या कौतुकास्पद कामासाठी बॅज आणि नाणे देण्यात आले. विशेष म्हणजे ही नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. या नाण्यांमध्ये राणीचा मुकुट असून तो टॉवर ऑफ लंडनवर देखील दिसून येतो. अशी नाणी फक्त तीन बनवली गेली असून यातील तिसरे नाणे विवानला सादर करण्यात आले आहे. विवान हे नाणे बैठका, सहल आणि अधिकृत भेटी दरम्यान बाळगू शकतो.
हे ही वाचा..
अमोल किर्तीकारांची मागणी फेटाळत मतमोजणीच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार
पाकिस्तानच्या राष्ट्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये अल्पसंख्याकांसाठी शून्य तरतूद
लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत खटला चालवण्यास मंजुरी
सामन्यानंतर अमेरिकेचा क्रिकेटपटू हॉटेलमधून करतो वर्क फ्रॉम होम
लवकरच या पुस्तकाची मराठी आणि हिंदी आवृत्तीही वाचकांच्या भेटीला येणार आहे. विवान कारुळकरने लिहिलेल्या या पुस्तकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले असून अवघ्या १६ व्या वर्षी हे पुस्तक लिहून सनातन धर्माचा प्रसार-प्रचार करत असल्याबद्दल शाबासकीही दिली आहे.