युवा लेखक विवान कारुळकर याचे डहाणू फेस्टीवलमध्ये कौतुक!

भरत राजपूत यांच्या प्रयत्नातून दरवर्षी आयोजन होते महोत्सवाचे

युवा लेखक विवान कारुळकर याचे डहाणू फेस्टीवलमध्ये कौतुक!

अवघ्या १७ व्या वर्षांत द सनातन : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस आणि द सनातन : ट्रू सोर्स ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस या दोन पुस्तकांचे लेखन, संयुक्त राष्ट्रसंघात भाषण करणारा जगातील सर्वात कमी वयाचा तरुण, खगोल संशोधक, यशस्वी पॉडकास्टर विवान कारुळकर याचा डहाणू फेस्टीवलमध्ये विशेष सत्कार करण्यात आला.

डहाणू फेस्टीवल गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाला आहे. डहाणू चे नगराध्यक्ष आणि भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे प्रारंभीपासून या फेस्टीवलचे आधारस्तंभ राहिले आहेत.

मनोरंजन, खाद्य संस्कृती, वॉटर स्पोर्ट्स, साहसी खेळ अशा अनेक रंगांचे इंद्रधनुष्य म्हणजे डहाणू फेस्टीवल. या लोकप्रिय सोहळ्यात युवा लेखक विवानला विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात आले होते. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विवानच्या मातोश्री शीतल कारुळकर या देखील उपस्थित होत्या.

हे ही वाचा:

असावा सुंदर चांदीचा बंगला, चंदेरी, सोनेरी लखलखता चांगला! काँग्रेस आमदाराची अफाट संपत्ती!

राष्ट्रपतींवरील काँग्रेसची टिपण्णी म्हणजे देशातील १० कोटी आदिवासी बांधवांचा अपमान

मुंडे-अजितदादा दोघेही आरसा साफ करतायत…

देशाची अर्थव्यवस्था ६.३ ते ६.८ टक्के दराने वाढणार

कारुळकर परीवाराचे मूळ रत्नागिरीत असले तरी त्यांचा डहाणूशी घट्ट संबंध आहे. विवानचे वडील उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचे बालपण पालघर जिल्ह्यातील झरी या गावात गेले. त्यांचे शिक्षणही डहाणूमध्ये झाले. कारुळकर परिवार हा डहाणूतील शेतकरी परीवार आहे. भरत राजपूत हे प्रशांत कारुळकर यांचे बालमित्र.
“माझा सत्कार म्हणजे घरच्या लोकांनी केलेले कौतुक असून मी या प्रेमामुळे भारावून गेलो” असे विवान याने सांगितले आहे.

Exit mobile version