चंद्रभागेच्या तिरी, दुमदुमली पंढरी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठू माउलीला साकडे

चंद्रभागेच्या तिरी, दुमदुमली पंढरी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

राज्यासह देशभरात आषाढी एकादशीनिमित्त मोठा उत्साह असून देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भाविक पंढरपूरमध्ये जमले आहेत. माउलींच्या चरणी लीन होण्यासाठी सर्व वारकरी आणि विठुरायाचे भक्त गेल्या काही दिवसांपासून पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. दिंड्या-पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील संपन्न झाली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय ५५ वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय ५० वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या १६ वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत.

राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठू माउलीला साकडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत असं विठुरायाचरणी साकडं घातलं.

पांडुरंगाच्या आशीर्वादाने सलग तीन वर्षे विठ्ठलाची महापूजा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे स्वतःला भाग्यवान समजत असल्याच्या भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. पाऊस चांगला झाला आहे. पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचे संकट नाही. यंदा मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार चांगले काम करत आहे. चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे, असे साकडं एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातले.

हे ही वाचा:

भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ माउलींच्या चरणी

कवी नारायण सुर्वेंच्या घरात केली चोरी पण, नंतर चोर चिठ्ठी लिहित म्हणाला सॉरी…

काँग्रेसचे हिरामण खोसकर नाना पटोलेंवर संतापले!

विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या

श्री विठ्ठलाच्या पूजेला मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्यांची उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी, वडिल संभाजीराव शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले होते.

Exit mobile version