उत्तराखंड सरकारने राज्यातील चार धार्मिक स्थळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या देवस्थानांमध्ये दर्शन घेताना आता ‘व्हीआयपी दर्शन’ सेवा बंद करण्यात आली आहे. शुक्रवार, १३ मे रोजी उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. सर्व व्हीआयपी म्हणजेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आता सर्वसामान्यांप्रमाणेच दर्शन घेता येणार आहे.
केदारनाथ धामचे दरवाजे ६ मे रोजी भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी डीजीपी यांनी काढलेल्या आदेशानुसार सर्व व्हीआयपी लोकांना आता सर्वसामान्यांप्रमाणे दर्शन घेता येणार आहे. याआधी योग्य नियोजनाअभावी २८ लोकांचा मृत्यू झाला होता.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनीही लोकांना आवाहन केले असून आरोग्यसंबंधी ज्यांना तक्रारी असतील त्यांनी काही दिवसांनी केदारनाथची यात्रा करावी, असं आवाहन त्यांनी केले आहे. तसेच हृदयसंबंधी काही त्रास असल्यास नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन यात्रेत सहभागी व्हावे असं त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर
ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण
“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”
नातवंडे द्या, नाहीतर पाच कोटी भरपाई द्या; न्यायालयात केला अजब दावा
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून केदारनाथ यात्रा बंद करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षांनंतर भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. गेल्या ६ दिवसांत जवळपास १ लाख ३० हजार लोकांनी दर्शन घेतले आहे.