हिजाबशिवाय सोशल मीडियावर व्हिडीओ; मग शाळेत येतानाच का हिजाबचा हट्ट?

हिजाबशिवाय सोशल मीडियावर व्हिडीओ; मग शाळेत येतानाच का हिजाबचा हट्ट?

हिजाब वादामुळे गरीब विद्यार्थ्यांचे किती नुकसान होत आहे, हेच हिजाब वादातून स्पष्ट होते आहे. हिजाबच्या वादामुळे अनेक मुलींच्या अभ्यासाचे नुकसान होत असल्याची भावना विद्यार्थीनी व्यक्त करत आहेत.

कर्नाटकात निर्माण झालेल्या हिजाब वादाचे संपूर्ण देशात पडसाद उमटले आहेत. कर्नाटकातील जवळपास सर्वच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा वाद पसरला आहे. शाळा-महाविद्यालये सुरू असली तरी त्यांच्यात हिजाबबाबत नेहमीच काही ना काही वाद होतात. हा वाद टाळण्यासाठी राज्य सरकारने काही शाळा-कॉलेज बंद केले आहेत  तर काही ठिकाणी कलम १४४ लागू केला आहे. त्यामुळे विधार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे.

या वादाबाबत काही मुलींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या मुलींनी कन्नड भाषेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित  केले आहेत. मुस्लीम मुलींनाच शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालण्याची परवानगी का द्यावी? कारण त्याच मुली जेव्हा इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर त्यांचे  व्हिडिओ पोस्ट करतात तेव्हा त्यांनी हिजाब घातलेला नसतो मग फक्त शाळा-कॉलेजात येताना हिजाब घालण्याची मागणी का करत आहेत?असा प्रश्न त्या मुलींनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा

शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..

हिजाबच्या वादामुळे शाळा-कॉलेज बंद आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्यांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. मुस्लिम मुलींना अभ्यासाची आवड असेल तर त्यांनी हिजाबशिवाय शाळेत यावे. अनेक दिवस चाललेल्या या वादामुळे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे या विद्यार्थिनीचे मत आहे.

Exit mobile version