संस्कृती, परंपरेचे दर्शन घडवणारा कन्नड सिनेसृष्टीचा व्हीडिओ व्हायरल

संस्कृती, परंपरेचे दर्शन घडवणारा कन्नड सिनेसृष्टीचा व्हीडिओ व्हायरल

दक्षिणेकडील चित्रपटांत नेहमीच भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन विविध पद्धतीने घडत असते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने कर्नाटकमधील सिने अभिनेत्यांना घेऊन केलेल्या व्हीडिओतून याच संस्कृतीचा जागर होताना दिसतो. तो व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

कर्नाटकमधील प्रसिद्ध सिने अभिनेता सुदीपपासून हा व्हीडिओ सुरू होतो आणि नंतर एकेक कलाकार व्हीडिओत दिसू लागतो. सुदीपच्या मागे देशातील क्रांतिकारकांचे फोटो लावलेले दिसतात. त्यांचेही या स्वातंत्र्यचळवळीत मोठे योगदान आहे, हे त्यातून दिसते. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंग अशा महापुरुषांचे फोटो भिंतीवर दिसतात. दिव्यांच्या प्रकाशाने ते तेजोमय झालेले आहेत. वंदे मातरमची धून वाजत असते. मग एकेक कलाकार व्हीडिओत दिसू लागतो.

हे ही वाचा:

कमी उत्पन्न, तरच पेन्शन अटल

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलकडून खास डूडल

गांधीजी, डॉ. आंबेडकर, सावरकर, सुभाषबाबूंचा त्याग विसरता येणार नाही

आता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’

 

कष्टकरी समाज, शेतकरी, महिला, मुले सगळ्यांचे या देशाच्या स्वातंत्र्यात, प्रगतीत योगदान असल्याचा संदेश त्यातून दिला जातो. संगीत, नृत्य, कला यातूनही देशभावनेचे दर्शन व्हीडिओतून होते. भारताचा वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादही मुलांसमवेत गोलंदाजीची मजा लुटताना त्यात दिसतो. भारतमातेच्या फोटोवर फुलांचा वर्षाव करून तिला वंदन करताना कलाकार दिसतात. मल्लविद्या, शक्तीची देवता म्हणून हनुमानाची पूजा याचे महत्त्व दिसते. सुदृढ, तंदुरुस्त देश हा संदेश त्यातून दिला जातो.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध स्तरावर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यात कन्नड सिनेमातील कलाकारांना घेऊन केलेल्या या व्हीडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Exit mobile version