गुजरातमधील विद्यापीठात हिंदू धर्माचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. यासंदर्भातील माहिती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली आहे. सुरत येथील वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठात ‘हिंदू धर्म’ शिकवला जाणार आहे. अभ्यासक्रमात हिंदू धर्माचा समावेश करणारे हे गुजरातमधील पहिले आणि देशातील १४ वे विद्यापीठ आहे. पुढील सत्रापासून हिंदू धर्माविषयाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार केला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किशोर सिंह चावडा यांनी दिली. या विद्यापीठाशी २४५ महाविद्यालये संलग्न आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किशोर सिंह चावडा यांनी सांगितले की, वेगवेगळ्या सत्रामध्ये वेगवेगळे विषय शिकवले जाणार आहेत. हिंदू धर्माचा अभ्यास या विषयावर शैक्षणिक सत्र सुरू करणारे हे गुजरातमधील पहिले आणि देशातील १४ वे विद्यापीठ ठरेल. बनारस हिंदू विद्यापीठाने हिंदू धर्म या विषयाचा अभ्यासक्रम तयार केला असून, देशातील अनेक विद्यापीठांमध्ये हा विषय शिकवला जातो.
हे ही वाचा:
पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका
चार टक्के व्याजावर पालिकेचे ‘बेस्ट’ कर्ज
या विद्यापीठात रसायनशास्त्र, समाजशास्त्र, सांख्यिकी, इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र या पारंपारिक विषयांव्यतिरिक्त लोक प्रशासन, ग्रामीण अभ्यास, तुलनात्मक साहित्य आणि जलचर- जीवशास्त्र यांसारख्या विषयांचेही अभ्यासक्रम चालवले जातात.
या विद्यापीठाचे नाव पूर्वी दक्षिण गुजरात विद्यापीठ होते. जे २००४ मध्ये वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ असे करण्यात आले. हे नाव महान गुजराती कवी नर्मद यांच्या नावावर आहे. या विद्यापीठात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.