गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!

गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!

हिंदु संस्कृतीत संपूर्ण वर्षभर सणांची रेलचेल असते. चैत्रातल्या गुढीपाडव्यापासुन सुरू होणाऱ्या सणांची ही मालिका फाल्गुनातल्या होळी रंगपंचमीने संपते. तोच पुन्हा चैत्र गुढी उभारायला तयार! या सर्व सणांमध्ये सर्वात जास्त उत्साह असतो तो सण म्हणजे दिवाळी. प्रामुख्याने पाच दिवसांचा जरी हा सण समजला जात असला तरीदेखील या सणाचे आगमन होते ते वसुबारस या दिवसानेच!

गाई- गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात.

वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरा केली जाते. घरात, अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक, उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे.

हे ही वाचा:

जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी

‘मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?’

…आता दिल्लीतील महाविद्यालयांना वीर सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव

१०० कोटी वसुली प्रकरणात संतोष जगताप अटकेत

या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.

ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा- वरणाचा स्वयंपाक केला जातो. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर गायीची पूजा, ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात.

वसुबारसच्या दिवशी गहू, मूग, दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही न खाण्याची प्रथा आहे.

Exit mobile version