पुरातत्त्व खात्याला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्याची परवानगी

वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिले आदेश

पुरातत्त्व खात्याला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्याची परवानगी

चार हिंदू महिलांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाने संपूर्ण ज्ञानवापी मशिदीचा शास्त्रिय पद्धतीने सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे. केवळ त्याठिकाणी असलेला हात पाय धुण्यासाठी वापरला जाणारा वझुखाना वगळून इतर भागाचे सर्वेक्षण करण्याची ही परवानगी आहे. सदर मशीद ही तिथे आधीपासून असलेल्या मंदिरापूर्वीची आहे अथवा नाही, याची पाहणी त्या सर्वेक्षणात होईल. भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. १४ जुलैला दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या. नंतर न्यायाधीश एके विश्वेशा यांनी सदर निर्णय दिला.

 

 

न्यायालयाने म्हटले आहे की, हे सर्वेक्षण सकाळी ८ ते १२ या वेळेत व्हायला हवे. यादरम्यान मशिदीत नमाज अदा करण्यास कोणतीही मनाई करण्यात येणार नाही. शिवाय, मशिदीला कोणत्याही प्रकारचे नुकसानही होऊ नये याची काळजी घेतली जाईल. यावर्षी मे महिन्यात चार हिंदू महिलांनी ७५ (ई) च्या अंतर्गत याचिका दाखल केली होती. पूर्ण वर्षभर तिथे मशिदीच्या परिसरात पूजाअर्चना करण्याची परवानगीही मागण्यात आली होती.

हे ही वाचा:

मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.२ टक्के; अर्थात २० कोटी

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा व्हॉट्सऍपवर तक्रार

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजित पवारांच्या पाठीशी

एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांचे १० गट करून पंतप्रधान करणार चर्चा

या चार महिलांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, इथे स्वयंभू ज्योतिर्लिंग अस्तित्वात आहे. पण ते मुस्लिम आक्रमकांनी अनेक वेळा भग्न केले. त्यात महमूद गझनीच्या १०१७मध्ये केलेल्या आक्रमणाचा समावेश आहे. त्यात पुढे असेही म्हटले आहे की, क्रूरकर्मा औरंगजेब याने १६६९मध्ये असे फर्मान काढले होते की, हे मंदिर उद्ध्वस्त करा. त्यानंतर या मंदिरावर घण घातले गेले. त्यानंतर याच मंदिराच्या शेजारी काशी विश्वनाथाचे मंदिर १७७७-१७८०मध्ये बांधले गेले. राणी अहिल्यादेवी यांनी हे मंदिर बांधले.

 

 

या अर्जात असेही म्हटले आहे की, ही मशीद सध्या वाईट स्थितीत आहे पण त्यात मंदिर असल्याचे स्पष्ट दिसते. याठिकाणी मंदिर होते याचा खुणा स्पष्ट दिसत असल्याचे कुणीही सांगू शकेल.

 

Exit mobile version