धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वाराणसीला वेगळीच ओळख प्राप्त होणार आहे. वाराणसी आता जगातील पहिले संस्कृत शहर म्हणून ओळखले जाणार आहे.
वाराणसीमध्ये सर्वात जास्त संस्कृत पाठशाळा असून, संस्कृत शिकणारे सर्वात जास्त विद्यार्थी देखील वाराणसीतच आहेत. सध्या या शहरात एकूण ११० संस्कृत पाठशाळा सुरू आहेत. यामध्ये आणखी दोन पाठशाळांची भर पडणार आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यभरात १३ नव्या संस्कृत पाठशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
रेमडेसिवीर!! भाजपाने ‘आणून दाखवले’!!
लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही- भाजपा
तृणमूलच्या दलित विरोधी राजकारणाविरोधात भाजपा सज्ज
योगी आदित्यनाथ सरकारच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ सरकार माध्यमिक आणि सामान्य शिक्षण मंडळाच्या धर्तीवर संस्कृत मंडळ काढणार आहे. संस्कृत मंडळाच्या स्थापनेनंतर संस्कृत भाषेला नवी ओळख प्राप्त होणार आहे.
या बरोबरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या पुढाकाराने सरकारने आता संस्कृतमधून देखील प्रसिद्धी पत्रक काढायला सुरूवात केली आहे. योगी आदित्यनाथांच्या पुढाकारानंतर संस्कृत मंडळाने राज्यभरात संस्कृतचा प्रसार करायला सुरूवात केली आहे.
उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळांद्वारे राज्यात १,१६४ संस्कृत पाठशाळा चालवल्या जातात, त्यापैकी ९७१ अनुदानित शाळा आहेत. या शाळांमधून सुमारे ९७,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना संस्कृत सोबत आधुनिक शिक्षणाचे धडे देखील दिले जात आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने सुमारे २०० गुरूकुलांमधील ४००० विद्यार्थ्यांना मोफत जेवणाची आणि होस्टेलची सोय करून देण्याचे ठरवले आहे.