भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) यांच्या माध्यमातून बिहार येथील नालंदा विद्यापीठात लोकशाहीचा ‘वैशाली’ उत्सव या भव्य कार्यक्रमाचे आयोजन १५ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. भारताच्या लोकशाहीवादी परंपरांचे दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडविले जाणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक प्रियदर्शी दत्ता यांच्या इंडिया : द मेनस्प्रिंग ऑफ डेमॉक्रेटिक ट्रॅडिशन्स या पुस्तकाचे प्रकाशनही केले जाणार आहे. त्याशिवाय, लोकशाहीची संस्कृती आणि लोकशाहीची अंमलबजावणी या विषयावरील दोन चर्चासत्रांचे आयोजनही यावेळी होईल.
या उत्सवाला वैशाली उत्सव असे नामकरण करण्यामागील कारण म्हणजे वैशाली हे सहाव्या शतकातील शहर होते आणि तिथे लोकशाही नांदत होती. त्यामुळे या शहराचेच नाव उत्सवाला देण्यात आले आहे. बिहारमध्येच लोकशाहीचा जन्म झाल्याचा इतिहास आहे. वैशाली लोकशाही उत्सवाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कारण वैशाली या शहरातच लोकशाहीचा उगम झाला होता. त्यामुळे त्या शहरातील लोकशाही मूल्यांचे स्मरण म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
हे ही वाचा:
वनडे वर्ल्डकपमधील न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या नातेवाईकांची अनोखी जाहिरात
उद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब
इसीसच्या पुणे मॉड्युलमधील फरार संशयितांवर प्रत्येकी ३ लाखाचे इनाम
विवाहित प्रियकराने प्रेयसीला बुडवून मारले, दोन जण अटकेत
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. नवी दिल्लीत नुकतीच जी-२० परिषद झाली, त्यात भारत : लोकशाहीची जननी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर वैशाली उत्सवाचे आयोजन केले जात आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून भारत मंडपम येथे ते प्रदर्शन आयोजित केले गेले होते. भारतातील लोकशाही तत्त्वांची माहिती त्या प्रदर्शनातून मांडण्यात आली.
बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा, सांस्कृतिक मंत्री मीनाक्षी लेखी शिवाय, विविध देशांचे राजदूतही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. आयसीसीआरच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितले की, लोकशाहीच्या तत्त्वांची चर्चा करताना भूतकाळ आणि वर्तमान यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शिवाय, याउत्सवाच्या आयोजनातून लोकशाही मूल्यांना भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर आकार देता येईल, असा हेतू या उत्सवाच्या आयोजनामागे आहे.