गेल्या फेब्रुवारीपासून सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही संपण्याची चिन्हे नाहीत. या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले असले तरी डिसेंबरपासून ते आतापर्यंत रशियातील सुमारे २० हजार जण ठार तर, एक लाख जण जखमी झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
अमेरिकेने काढलेल्या गुप्त माहितीचा अहवाल नुकताच सार्वजनिक करण्यात आला. त्या आधारे ही माहिती मिळाल्याचा दावा अमेरिकेच्या व्हाइट हाऊसच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी केला आहे. मात्र ही गुप्त माहिती त्यांनी नेमकी कशाच्या आधारावर दिली आहे, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
युक्रेनच्या पूर्वेकडील दोन्तेस्क भागात रशिया आणि युक्रेनच्या सैन्यांमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. बखमुत शहरावर नियंत्रण मिळविण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. मारले गेलेल्या या सैनिकांपैकी सुमारे अर्धे सैनिक वॅगनर समूहाच्या माध्यमातून भरती केलेले आहेत. सध्या रशिया आणि युक्रेनच्या सैनिकांमध्ये बखमूत शहराजवळ तुंबळ युद्ध सुरू आहे.
हे ही वाचा:
समाजवादी पक्षाचे आमदार तसेच त्यांच्या मुलांनी घातला ४५ लाखांचा गंडा
काँग्रेसची आता बजरंगबलीला बंदिस्त करण्याची तयारी !
गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या विरोधातील गुन्ह्यांच्या फाईल्स गहाळ
मंगेश सातमकरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
रशियन सैनिक शेवटच्या शिल्लक राहिलेल्या रस्त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र तो अद्याप युक्रेनच्या ताब्यात आहे. या दरम्यान युक्रेनच्या हवाई सुरक्षा दलाने सोमवारी रशियन लष्कराने सोडलेल्या १८पैकी १५ क्षेपणास्त्रांना नष्ट केले. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, पूर्वेकडचे शहर पावलोऱ्हादवर रशियन सैन्य रात्रभर हल्ले करत होते. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर, ४०जण जखमी झाले.