जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाही!

गडावर लावलेली संचारबंदी अटी आणि शर्थी ठेवून उठवण्यात आली आहे

जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाही!

काही महिन्यांपूर्वी विशाळगडावर अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे राडा झाला होता. यानंतर गडावर संचारबंदी लावण्यात आली होती. अखेर ही संचारबंदी उठवण्यात आली असून गडावर उरूस उत्सव साजरा होणार का याकडे लक्ष लागून होते. मात्र, विशाळगड येथे रविवार, १२ जानेवारी रोजी होणाऱ्या उरुस उत्सवाला जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने परवानगी नाकारली आहे. विशाळगडावर पर्यटक, भाविकांना जाण्यासाठी अटी आणि शर्थी लावून परवानगी दिली असली तरी गडावरील अतिक्रमणाविरोधातील कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावर कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे.

विशाळगडावर रविवारी उरूस होणार होता, त्या ऊरुसाला कोणत्याही पद्धतीची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये, या पार्श्वभूमीवर सावधनतेचे पाऊल म्हणून प्रशासनाने उरूसाची परवानगी नाकारल्याची माहिती आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगलीत हिंदू मोर्चात बोलताना विशाळगडावर उरूस कसा साजरा होतो तेच पाहतो, असा इशारा दिला होता. अन्य धर्मियांनी हिंदू समाजाच्या भावना भडकतील, असे कोणतेही कृत्य करू नये. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे कोणतेही पाऊल उचलू नये. शासन म्हणून आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत, असे नितेश राणे म्हणाले होते. मात्र, आता प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे विशाळगडावर शुकशुकाट असून येथे उरूस साजरा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा..

बांगलादेशींकडून जप्त केलेल्या बनावट कागदपत्रांवर आप आमदाराची स्वाक्षरी; पोलिसांनी धाडली नोटीस

लॉस एंजेलिसच्या आगीत गॅरी हॉल ज्युनियरची १० ऑलिम्पिक पदके जळून खाक!

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सातही आरोपींवर मोक्का!

केरळमध्ये दलित मुलीचे तब्बल ६४ जणांनी केले शोषण

विशाळ गडावरील अतिक्रमण काढण्याविरोधात जुलै महिन्यात मोठा वाद झाला होता. हिंसाचारानंतर संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. अखेर ही संचारबंदी अटी आणि शर्थी ठेवून उठवण्यात आली आहे. विविध हिंदू संघटना आणि शिवभक्तांच्या मागणीनंतर प्रशासनाने विशाळ गडावरील वाढलेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, पावसाळ्यात अतिक्रमणाविरोधात कारवाई कशाला? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारत गडावरील अतिक्रमणाविरोधात सुरु करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यामुळे गडावरील उर्वरित अतिक्रमणावर केव्हा कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version