बिग बॉस फेम उर्फीच्या वक्तव्यांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या
बिग बॉस शोमधून पहिल्या आठवड्यात बाहेर पडलेली उर्फी जावेद हिने आपल्या वक्तव्यांनी आणि आपल्या विचारप्रदर्शनाने अनेकांना भुवया उंचवायला लावल्या आहेत.
उर्फी म्हणते की, मी मुस्लिम आहे, पण मी इस्लामची प्रतिमा मलिन करत असल्याची टीका काही मुस्लीम लोक करतात. ते माझा तिरस्कार करतात. कारण मुस्लिम पुरुषांना स्त्रियांनी ठराविक पद्धतीने वागले पाहिजे असे वाटत असते. त्यांना समाजातील सर्व महिलांवर नियंत्रण ठेवायचे असते. मी इस्लामचे पालन करत नाही आणि तशी माझ्यावर कधी सक्तीही करण्यात आली नाही. पण मी सध्या भगवदगीतेचे वाचन सुरू केले आहे. मला हिंदू धर्म जाणून घ्यायचा आहे.
उर्फी म्हणते की, मी एका विशिष्ट धर्माची असल्यामुळे मला ट्रोल केले जाते. कारण मी त्यांना अपेक्षित असल्याप्रमाणे वागले पाहिजे. पण मी स्वतंत्र आहे आणि माझ्या मर्जीनुसारच वागणार.
हे ही वाचा:
अनिल परब, आपण दोन पावले पुढे आला असता तर…
‘प्रलय’ ची दुसरी चाचणीही यशस्वी
जगातील पहिला SMS बोलू लागला लाखांची बोली!
धक्कादायक! महाराष्ट्रातील २४ हजार महिला गायब
उर्फीने सांगितले की, माझे वडील हे परंपरावादी होते. मी १७ वर्षांची असताना माझी आई आणि आम्हाला मुलांना सोडून ते निघून गेले. माझी आईदेखील धार्मिक स्त्री आहे पण तिने कधीही आम्हाला धर्माची सक्ती केली नाही.
माझे भाऊ, बहीणही इस्लामचे पालन करतात पण माझ्यावर तसे करण्याची सक्ती कुणीही केलेली नाही. तुमचा धर्म तुम्ही कुणावर लादू शकत नाही. सगळे हृदयातूनच आले पाहिजे. नाहीतर तुम्ही व अल्ला आनंदी होणार नाही.