23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृतीबोईसर पोलिस ठाण्याबाहेर मुस्लिम जमावाचा गोंधळ

बोईसर पोलिस ठाण्याबाहेर मुस्लिम जमावाचा गोंधळ

Google News Follow

Related

पालघरमध्ये अनधिकृत उभारलेल्या मदरशामधील एका इसमाला मारहाण करण्यात आल्यानंतर बोईसरमध्ये वातावरण बिघडले. त्यानंतर हे प्रकरण शांत करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्यानंतरही मुस्लिम समाजातील समाजकंटकांनी जमाव करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले. या मारहाणीनंतर स्थानिक मुस्लिम नेत्यांनी दबाव आणून सहा तरुणांवर गुन्हा दाखल करायला भाग पाडले.एकाच व्यक्तीने मदरशातील व्यक्तीच्या कानशिलात लगावल्यानंतरही सहाजणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे.

बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृत उभारलेल्या मदरशात धुलिवंदनाच्या दिवशी वाद झाला होता. या मदरशातील इसम मोईनुद्दीन अब्दुल कुरेशी याच्याकडे एक युवक आपल्या मित्रांसमवेत डोके दुखत असल्याची तक्रार घेऊन गेला. या युवकाच्या डोक्यावर फुंकर मारताना थुंकी उडाल्याच्या कारणामुळे त्या युवकाने या इसमाच्या कानशिलात लगावली. पण त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न नंतर झाला. त्यानंतर तिथे १५०-२०० लोकांचा जमाव आला आणि पोलिसांसमोर ताकदीचे प्रदर्शन करू लागला. त्यावरून पोलिसांनी अभिषेक नंदन, प्रिंस, राजन, संतोष यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला. येथील मुस्लिम नेत्यांनी राजकीय दबाव आणून या व्यक्तीवर गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप केला जात आहे.

सदर घटना मदरशात घडल्याचे सांगितले जात असले तरी मोईन्नुद्दीन अब्दुल कुरेशी हाच तिथे राहात आहे. मदरसा ही खासगी मालमत्ता नसल्याने किंवा कुरेशीचे ते मालकी घर असल्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देत त्याला मदरसा म्हटले गेले आहे का, असा संशयही व्यक्त होत आहे.

हे ही वाचा:

भाजपाला मतदान केल्यामुळे महिलेला तिहेरी तलाकची धमकी

अफगाणिस्तानच्या अर्थमंत्र्यांना चालवावी लागतेय टॅक्सी

हिजाब निर्णयाला विरोध करणाऱ्या विद्यार्थीनींना प्रयोग परीक्षेची संधी नाही

हरभजन सिंग, राघव चड्डा जाणार राज्यसभेत

 

बोईसर पोलिस ठाण्याने याप्रकरणात दोन्ही धर्मात शांतता राहावी असा प्रयत्न केला. पण पोलिस ठाण्याच्या बाहेर रात्री आठ वाजता मुस्लिमांनी मोठी गर्दी केली. याच दरम्यान रात्री ८.३० वाजता या बैठकीसाठी आलेले बजरंग दलाचे चंदन सिंग पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यावर जावेद लखानी व त्यांच्यासोबत असलेल्या इसमाने त्यांच्याशी वाद घातला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा