हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राहणार उपस्थित

अमृतमयी गो भारती संमेलन, वनवासी कल्याण आश्रम यांच्याकडून कार्यक्रम सादर होणार

हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राहणार उपस्थित

हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत मुंबईत भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याला चांगला प्रतिसाद लाभत असून मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेचं शनिवार, ११ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल हे सुद्धा शनिवारी या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत.

सकाळी ६.३० वाजता गंगा आरती केली जाणार असून विमल सिथोलिया हे प्रमुख पाहुणे म्हणून आणि मुख्य वक्ते म्हणून नंदलाल जी उपस्थित असणार आहेत. त्यानंतर ७.१५ वाजता योग साधनेने तिसऱ्या दिवसाची प्रसन्न सुरुवात होणार आहे. १०.१५ वाजता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये कन्या वंदन कार्यक्रम पार पडणार आहे.

गुरुपुत्र सभागृहात १०.१५ वाजता अमृतमयी गो भारती संमेलन होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा उपस्थित असणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्रीय गोरक्षा प्रमुख भाऊराव पूगले असणार आहेत. दुपारी २ वाजता राणी दुर्गावती मुलींचे वसतिगृह, वनवासी कल्याण आश्रम यांच्याकडून नृत्य प्रदर्शन होणार आहे. खंडेलवाल समाजाचे अध्यक्ष सीए के सी जैन, इस्कॉनचे गोरंग प्रभू, विशेष अतिथी गांधार ग्रुपचे अध्यक्ष रमेश पारीख, हिरा कंपनीचे डायाभाई सुधारिया, आयएनएनओच्या अध्यक्षा अंजना कोठारी, समाजसेवक महेश अग्रवाल हे उपस्थित असणार आहेत. सायंकाळी ५ वाजता कोण बनणार कृष्ण भक्त, ७.३० वाजता नृत्य कार्यकम होणार आहेत.

हे ही वाचा : 

मुस्लिमांना महाकुंभात येऊन दुकान मांडता येईल का?

वणवा घरापर्यंत पोहोचला, पण आपले घर त्यांनी सोडले नाही!

महाकुंभ मेळाव्यानिमित्त आकाशवाणीकडून ‘कुंभवाणी’

बिहारच्या माजी मंत्र्यासह अनेकांवर ईडीचे छापे

भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे आयोजन महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प), मुंबई ४००१०४ येथे हा मेळावा भरवण्यात आला आहे. ‘न्यूज डंका’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

Exit mobile version